West Indies Beat Sri Lanka, 3rd ODI Match Scorecard: तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने DLS नियमानुसार श्रीलंकेचा 8 विकेटने केला पराभव, एविन लुईसची 102 धावांची शानदार खेळी
वेस्ट इंडिजसाठी सलामीवीर एविन लुईसने 102* धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. एविन लुईस व्यतिरिक्त, शेरफेन रदरफोर्डने 50* धावा केल्या. असिथा फर्नांडोने श्रीलंकेच्या संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले.
Sri Lanka National Cricket Team vs West Indies National Cricket Team 3rd ODI Match 2024 Scorecard: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील (ODI Series) तिसरा सामना आज म्हणजेच 26 ऑक्टोबर रोजी खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पल्लेकेले (Pallekele) येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Pallekele International Cricket Stadium) खेळला जात आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने वेस्ट इंडिजचा पाच गडी राखून पराभव करत 2-0 अशी आघाडी घेतली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंका संघ क्लीन स्वीप करण्यासाठी मैदानात उतरेल, तर वेस्ट इंडिज संघाला व्हाईट वॉश टाळायचा आहे. श्रीलंकेची कमान चारिथ असलंका यांच्या हाती आहे. तर वेस्ट इंडिजचे नेतृत्व शाई होप करत आहे. (हेही वाचा - Sri Lanka vs West Indies, 3rd ODI Match 1st Inning Scorecard: तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने वेस्ट इंडिजला दिले 195 धावांचे लक्ष्य, कुसल मेंडिसने केवळ 22 चेंडूत केल्या 56 धावा )
दरम्यान, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. पावसाने पुन्हा एकदा सामना विस्कळीत केला. त्यानंतर 23-23 षटकांचा सामना निश्चित झाला. श्रीलंकेच्या संघाने 23 षटकांत तीन गडी गमावून 156 धावा केल्या. श्रीलंकेसाठी कुसल मेंडिसने सर्वाधिक नाबाद 56 धावांची खेळी खेळली.
पाहा पोस्ट -
West Indies won the 3rd ODI cricket match by 8 wickets 9 (D/L) at Kandy.
Sri Lanka won the series 2:1.
Evin Lewis 102* #LKA #SriLanka #SLvWI pic.twitter.com/i2uMxCpXWB
— Sri Lanka Tweet 🇱🇰 (@SriLankaTweet) October 26, 2024
हा सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिज संघाला DLS नियमानुसार 23 षटकात 195 धावा करायच्या होत्या.लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिज संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 36 धावांवर संघाला पहिला मोठा धक्का बसला. वेस्ट इंडिज संघाने अवघ्या 22 षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. वेस्ट इंडिजसाठी सलामीवीर एविन लुईसने 102* धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. एविन लुईस व्यतिरिक्त, शेरफेन रदरफोर्डने 50* धावा केल्या. असिथा फर्नांडोने श्रीलंकेच्या संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. श्रीलंकेकडून असिथा फर्नांडो आणि दिलशान मदुशंका यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
(The above story first appeared on LatestLY on Oct 26, 2024 11:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

