Australia National Cricket Team vs India National Cricket Team, Border-Gavaskar Trophy: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धा सुरू होणार आहे. या ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ज्याची सुरुवात पर्थपासून होईल. टीम इंडिया आणि कांगारू संघ यांच्यातील पर्थ कसोटीला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी, आम्ही तुम्हाला आम्ही सांगणार आहोत की भारतात पर्थ कसोटी किती वाजता पाहू शकता आणि प्रत्येक सत्र कधी आणि किती वेळेपर्यंत चालेल याबद्दल तपशीलवार माहिती देऊ. (हे देखील वाचा: Ravindra Jadeja Stats In Test Cricket Againts Australia: ऑस्ट्रेलियाविरुद्ध रवींद्र जडेजाची कशी आहे कामगिरी, येथे वाचा अष्टपैलू खेळाडूची घातक आकडेवारी)
पर्थ कसोटी किती वाजता सुरू होईल?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पर्थ कसोटी 22 नोव्हेंबरपासून भारतीय वेळेनुसार सकाळी 7.50 वाजता सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत या दिवसापासून चाहत्यांना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
Set your alarm ⏰
Session timings of the first Test match at Perth (IST). ⌚️ 🇮🇳 ⚔️ 🇦🇺 pic.twitter.com/HyXdFfDptk
— CricXtasy (@CricXtasy) November 19, 2024
जाणून घ्या येथे प्रत्येक सत्राची वेळ
पर्थ येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याचे पहिले सत्र भारतीय वेळेनुसार सकाळी 7.50 पासून खेळवले जाईल. पहिल्या सत्राचे खेळ सकाळी 9.50 पर्यंत सुरू राहणार आहे. यानंतर सामन्यात 40 मिनिटांचा ब्रेक असेल. ब्रेकनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या सत्राचा खेळ सकाळी 10.30 वाजता सुरू होईल. दुसरे सत्र दुपारी 12.30 वाजेपर्यंत चालेल. या सत्रानंतर 20 मिनिटांचा टी ब्रेक असेल आणि दोन्ही संघ भारतीय वेळेनुसार दुपारी 12.50 वाजता दिवसाचे शेवटचे सत्र सुरू करतील. दोन्ही संघांमधील शेवटचे सत्र दुपारी 2.50 वाजेपर्यंत खेळवले जाईल. अशा परिस्थितीत, तुम्ही येथे प्रत्येक सत्राची वेळ जाणून घ्या आणि सामन्याचा आनंद घ्या..
बॉर्डर-गावस्करसाठी भारताचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरण, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, सरफराज खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.