IND vs PAK: शाहीन आफ्रिदीविरुद्ध काय असेल योजना? गौतम गंभीरने टीम इंडियाला दिल्ला सल्ला
Gautam Gambhir And Shaheen Afridi (Photo Credit - Twitter)

भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील आगामी टी-20 मध्ये (T20 World Cup 2022) महामुकला 23 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. सामन्यापूर्वी दोन्ही देशांचे माजी खेळाडू आणि क्रिकेट तज्ज्ञ आपापली मते मांडत आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीविरुद्ध (Shaheen Afridi) टीम इंडियाने आक्रमक फलंदाजी करायला हवी, असे मत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) व्यक्त केले. त्यांच्याविरुद्ध सतत आक्रमण करूनच धावा करता येतात. शाहीनविरुद्ध विकेट वाचवण्याचा विचार करू नये, असे गंभीरचे म्हणणे आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे शाहीन आफ्रिदी आशिया चषक स्पर्धेत खेळू शकला नाही. त्याने गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात कहर केला आणि विश्वचषकात प्रथमच भारताविरुद्ध पाकिस्तानला विजय मिळवून दिला.

स्टार स्पोर्ट्सच्या एका इव्हेंटमध्ये गौतम गंभीर म्हणाला, शाहीनसमोर विकेट वाचवण्याचा विचार करू नका. त्याच्याविरुद्ध धावा करण्याचा विचार करा. विकेट वाचवण्यासाठी खेळल्यास बॅकलिफ्ट, फूटवर्क कमी होईल. या विचाराने टी-20 क्रिकेट खेळता येणार नाही. मला माहित आहे की तो एक  धोकादायक गोलंदाज आहे, पण भारतीय फलंदाजांना त्याच्याविरुद्ध धावा करायच्या आहेत. (हे देखील वाचा: T20 World Cup 2022: भारत-पाकिस्तान सामन्यावर संकटाचे ढग, सामना रद्द होणार का?)

गौतम गंभीरचे म्हणने आहे की, टीम इंडिया या वेळी शाहीन आफ्रिदीचा सामना करु शकेल. गेल्या टी-20 विश्वचषकात रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली त्याच्याच वेगवान गोलंदाजी विरुध्द आऊट झाले होते. गंभीर म्हणाला आहे की भारताकडे तीन-चार जबरदस्त फलंदाज आहेत जे शाहीन आफ्रिदीचा सामना करुन रन बनवु शकतात.