
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये (Pahalgam Terrorist Attack) जीव गमावलेल्या हेमंत जोशी ( Hemant Joshi) यांच्या मुलाला महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या परीक्षेमध्ये (Maharashtra Board SSC Exam) 80% गुण मिळाले आहे. 16 वर्षीय ध्रुव हेमंत जोशी () याचा आज दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. ध्रुवचे वडील हेमंत जोशी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत 26 जणांपैकी एक होते. जोशी कुटुंब ध्रुवच्या परीक्षेनंतर कश्मीरला फिरायला गेले होते. त्याच्यासमोरच वडिलांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या आहेत.
PTI च्या वृत्तानुसार, दहावीत 80% गुण मिळालेल्या ध्रुवला भविष्यात डॉक्टर होण्याची इच्छा आहे. आता दहावीनंतर तो विज्ञान शाखेमध्ये अॅडमिशन घेणार आहे. असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. ध्रुव हा Omkar International School,चा विद्यार्थी आहे. आज त्याचं बोर्डातील परीक्षेचं यश पहायला त्याचे वडील नसणं ही गोष्ट दुर्देवी आहे. अशी भावना जोशी कुटुंबातील नातेवाईकांनी बोलून दाखवली आहे.
22 एप्रिलला झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये हेमंत जोशी यांच्यासोबत डोंबिवली च्या अतुल मोने आणि संजय लेले यांनीही जीव गमावला आहे. महाराष्ट्र सरकार कडून पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत सार्यांच्याच कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 मृतांना राज्य सरकार कडून मदतीचा हात; 50 लाखांची मदत,शिक्षण आणि नोकरी देखील देणार .
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने आज दहावीचा निकाल जाहीर केला आहे. राज्यात 94% विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.