CM OF Maharashtra | X@DevendraFadnavis

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला (Pahalgam Terror Attack) आज आठवडा पूर्ण झाला आहे. आठ दिवसांपूर्वी कश्मीर मध्ये 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळखल्या जाणार्‍या बैसरण व्हॅली मध्ये 4 दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. यामध्ये 26 जण मृत्यूमुखी पडले. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा पुरूषांचा समावेश आहे. आज (29 एप्रिल) महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकार कडून 50 लाखांची मदत केली जाणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. तसेच सरकार या कुटुंबातील सदस्यांना शिक्षण आणि नोकरी मध्येही मदतीचा हात देणार आहेत. पुण्याच्या संतोष जगदाळे या मृत व्यक्तीच्या मुलीला आसावरी जगदाळेला सरकारी नोकरी दिली जाईल असेही राज्य सरकारने जाहीर केले आहे. नक्की वाचा: Pahalgam Terror Attack: संतोष जगदाळे यांच्या पार्थिवाचं शरद पवार यांनी घेतलं अंत्यदर्शन; हल्ल्याच्या वेळी घातलेल्या कपड्यांवरच लेक आसावरीने केले अंत्यविधी.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी 6 मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली होती. नक्की वाचा: Terrorist Attack in Pahalgam: हल्लेखोरांनी पीएम मोदींची निंदा केली, वडिलांना इस्लामिक श्लोक म्हणायला लावले; पुण्याच्या जखमी संतोष जगदाळे यांंची लेक आसावरी जगदाळे ने सांगितला थरारक प्रसंग. 

पहलगाम मधील दहशतवादी हल्ला

पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा सध्या सार्‍याच स्तरांमधून निषेध केला जात आहे. पीएम नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबियांना या भ्याड हल्ल्याचा न्याय मिळवून दिला जाईल असे सांगण्यात आले आहे. सध्या भारत सरकार कडून या हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तान विरूद्ध कडक पावलं उचलली जात आहेत. देशातून सार्‍या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करत त्यांना मायदेशी परतण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सिंधू करार देखील रद्द करत पाणी रोखण्यात आले आहे. भारत-पाक दरम्यान असलेली अटारी बॉर्डर आता बंद करण्यात आली आहे.

पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडले  महाराष्ट्रातील सहा नागरिक 

1) अतुल मोने - डोंबिवली

2) संजय लेले - डोंबिवली

3) हेमंत जोशी- डोंबिवली

4)  संतोष जगदाळे- पुणे

5) कौस्तुभ गणबोटे- पुणे

6) दिलीप देसले- पनवेल

दरम्यान