
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Messages: छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांनी वडिलांच्या निधनानंतर 9 मराठा साम्राज्य सांभाळले. 14 मे राजी देशभरात त्यांची जयंती साजरी (Sambhaji Maharaj Jayanti 2025) केली जाते. महाराष्ट्रात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 रोजी रायगड किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 9 महिन्यांनी त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळली होती.
छत्रपती मराठीसह संस्कृत, फारसी, उर्दु, अरबी, ब्रज, इंग्रजी यांसारख्या अनेक भाषांचे जाणकार होते. संभाजी महाराज हे अतिशय हुशार, कर्तबगार, दुरदरषी, अनेक विद्या व कलांचे अधीपती व सर्वगुणसंपन्न होते. बुधभुषण हा छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला संस्कृत भाषेत लिहीलेला महत्त्वाचा ग्रंथ आहे. संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी तुम्ही खालील Quotes, Wishes, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन शंभूराजांची जयंती साजरी करू शकता. यासाठी तुम्ही खालील ग्रीटिंग्ज, फोटो मोफत डाऊनलोड करू शकता.
शृंगार होता संस्कारांचा
अंगार होता हिंदवी,
स्वराज्याचा, शत्रूही नतमस्तक होई जिथे,
असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा
संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

रूद्राचा अवतार
वाघाचा ठसा होता
अरे, सह्याद्रीला विचारा त्या
माझा शंभूराजा कसा होता!
संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

इतिहासात एक पराक्रमी योद्धा,
राजकारणीस साहित्यिक व रसिक
असं मिश्रण एकाच राजाच्या नशिबी आलं
ते म्हणजे छत्रपती संभाजीराजे!
संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

पराक्रमी योद्धा, एकही युद्ध न हरणारे स्वराज्य रक्षक,
ज्वलंत-कीर्तिमंत असे धर्मवीर शिवपुत्र,
शिवबाचा छावा व मराठा साम्राज्याचे
दुसरे छत्रपती
संभाजी महाराज यांना जयंतीच्या शुभेच्छा!

जंगलात सिंहा समोर जाणारे भरपूर होते,
पण सिंहांचा जबडा फाडणारा एकच होता.
स्वराज्याचं धाकलं धनी शंभुराजे.
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

औरंगजेबाने अत्यंत क्रूर पद्धतीने संभाजी महाराजांची हत्या केली. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येचा बदला संताजी घोरपडे आणि मालोजी घोरपडे यांनी घेतला. ते सैन्यासह थेट औरंगजेबाच्या छावणीत घुसले. मराठ्यांच्या आक्रमणाने छावणीत हाहाकार माजला. खुद्द औरंगजेबाने जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढला होता.