Video: संजू सॅमसन याची जबरदस्त फील्डिंग, 'सुपरमॅन' उडी मारत षटकार वाचवल्याबद्दल Netizens कडून कौतुक
संजू सॅमसनची सुपरमॅन उडी (Photo Credit: Twitter)

भारतीय (Indian Team) संघाचा फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) याने कदाचित या मालिकेतील फलंदाजीने फारसे प्रभावित केले नसले तरी, क्षेत्ररक्षणात त्याने सातत्याने सर्वांना प्रभावित केले. न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध पाच सामन्यांच्याआंतरराष्ट्रीय टी-20 मालिकेत 3-0 अशी आघाडी घेत टीम इंडियाने आपल्या बेंच खेळाडूंच्या सामर्थ्याची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या तीन टी-20 सामने जिंकल्यानंतर टीम इंडिया येत्या सामन्यांमध्ये काही नवीन खेळाडू खेळणार असल्याचे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने दावा केला होता. गेल्या दोन सामन्यांत भारताच्या रोटेशनच्या लाभार्थ्यांपैकी एक म्हणजे संजू सॅमसन. न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या 5 व्या टी-20 सामन्यात सॅमसनने असे शानदार आणि अविश्वसनीय क्षेत्ररक्षण केले जे पाहून त्याला प्लेयिंग इलेव्हनच्या बाहेर ठेवणे योग्य नसल्याचे नेटकऱ्यांना वाटत आहे. (IND vs NZ 5th T20I: टीम इंडिया 7 धावांनी विजयी, न्यूझीलंडचा 5-0 ने क्लीन स्वीप करत रचला इतिहास)

माउंट मौनगुनुईच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेच्या 5 व्या सामन्यादरम्यान सॅमसनने सुपरमॅनसारख्या सीमारेषाबाहेर जाणारा चेंडू केवळ सुपरमॅन उडी मारून पकडलाच नाही तर फुर्ती फखवत पटकन पुन्हा आत सीमारेषेच्या आत टाकलेलं पाहून सर्व लोकं आश्चर्यचकित झाले. असे करत सॅमसनने 4 धावा वाचवल्या. सॅमसनच्या या कामगिरीचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. क्रिकेट चाहते त्याला सुपरमॅन म्हणत आहेत. हे सर्व 8 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर घडले. पाहा व्हिडिओ:

पाहा संजूच्या फिल्डिंगवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

हुशार माणूस

सॅमसनने अचूक डिव्हिलियर्स सारखे केले

संधी हस्तगत कर

सॅमसनचे क्षेत्ररक्षण पाहिल्यानंतर कोहली

सिक्स कसा वाचवायचा!

दरम्यान, आजच्या या सामन्यात टीम इंडियाने पहिले बॅटिंग करत किवी संघाला विजयासाठी 164 धावांचे लक्ष्य दिले होते, मात्र त्यांना फॅट 156 धावांपर्यंत मजल मारता आली आणि 7 धावांनी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. एकेकाळी भारतीय संघाने सामना गमावला असे वाटत असताना त्यांनी जबरदस्त पुनरागमन करत न्यूझीलंडचा 5-0 ने क्लीन स्वीप केला.