Match Fixing वर शोएब अख्तर याचा खळबळजनक खुलासा, पूर्ण पाकिस्तानी क्रिकेट टीमला म्हटले मॅच फिक्सर
शोएब अख्तर (Photo Credit: Video Screen Grab)

मॅच फिक्सिंगची चर्चा सध्या क्रिकेट विश्वात जोराने सुरु आहे. बांग्लादेश संघाचा कर्णधार शाकिब अल हसन याला बूकींकडून फिक्सिंगची ऑफर मिळाल्याची माहिती लपवल्याने दोन वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. आणि आता मॅच फिक्सिंगच्या चर्चेत माजी पाकिस्तानी (Pakistan) वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने आपल्या वक्तव्याने नवा वाद उपस्थित केला आहे. मॅच फिक्सिंगबाबत नवीन विधान करताना शोएबने आपल्या साथीदारांवर सामना फिक्सिंगचा आरोप केला आहे. शोएब म्हणाला की जेव्हा तो खेळत असता तेव्हा मॅच फिक्सर्सने वेढलेले वाटायचे. एका टीव्ही कार्यक्रमात अख्तरने सांगितले की, पाकिस्तानकडून खेळताना मला वाटले की तो 11 च्या टीमबरोबर नाही तर 21 च्या संघासह खेळत आहे, ज्यातील 11 जण विरोधी संघातील तर 10 लोकं त्याच्या संघातील होते. अख्तरच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तान क्रिकेट पुन्हा एकदा मॅच फिक्सिंगमध्ये अडकला आहे. (शाहीन अफरीदी वर TikTok मॉडल हरीम शाह ने लावले खळबळजनक आरोप, व्हिडिओ कॉल दरम्यान क्रिकेटर ने प्राइवेट पार्ट दाखवत मास्टरबेट केल्याचा दावा)

अख्तर मूळत: 2010 च्या फिक्सिंग प्रकरणाचा उल्लेख करीत होता ज्यामध्ये मोहम्मद आमिर (Mohammad Amir), पाकिस्तानचे तत्कालीन कर्णधार सलमान बट (Salman Butt)आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद असिफ (Mohammad Asif) अडकले होते. यासर्वांवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आधीच स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आधीच बंदी घातली आहे. एका टीव्ही कार्यक्रमात बोलताना अख्तर म्हणाला की मी पाकिस्तानला कधीही फसवू शकत नाही, मंच फिक्सिंग कधीच करू शकत नाही पण मला सट्टेबाजांनी वेढलेले वाटायचे. मी त्यावेळी 21 लोकांविरुद्ध, 11 त्यांचे आणि 10 माझे होतो. बुकी कोण होता कुणास ठाऊक. 4 वर्षीय अख्तरने सांगितले की त्याला फिक्सिंगबद्दल कळताच आश्चर्य वाटले. तो म्हणाला, “मी आमिर आणि आसिफला समजावण्याचा प्रयत्न केला. हे प्रतिभा नष्ट करण्यासाठी आहे. जेव्हा मी हे ऐकले तेव्हा मी फार दु: खी झाले आणि मी भिंतीवर हात मारला. पाकिस्तानचे दोन प्रमुख गोलंदाज, दोन महान वेगवान गोलंदाज नष्ट झाले होते. काही रुपयांसाठी त्यांनी स्वतःला विकले होते.”

अख्तर 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पाकिस्तानच्या अनेक खेळाडूंवर सामना फिक्सिंगचा आरोप लागला आहे. त्यापैकी मोहम्मद आमिरने 2017 मध्ये पुनरागमन केले. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणार्‍या पाकिस्तानी संघाचा आमिर सदस्य होता. नुकतंच त्याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची जाहीर केली.