क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणाऱ्या सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने दोन दशकांहून अधिक काळ क्रिकेट खेळला. यावेळी त्याच्याकडे क्रिकेटशी संबंधित सर्व किस्से आहेत. मास्टर ब्लास्टरने प्रसिद्धीच्या मार्गावर अनेक विक्रमांची नोंद केली. सचिनच्या कारकिर्दीच्या वेळी चाहत्यांना मैदानावर तेंडुलकर-अख्तर, तेंडुलकर-ली आणि तेंडुलकर-शेन वॉर्न (Shane Warne) अशा अनेक लढाया पाहायला मिळाल्या आहेत. मास्टर ब्लास्टर खेळाच्या काही उत्कृष्ट गोलंदाजांविरूद्ध अचूक शॉट्स मारत असत म्हणून सर्वांचे लक्ष तेंडुलकरवर असायचे. तेंडुलकरबरोबर ड्रेसिंग रूममध्ये बर्यापैकी वेळ घालवणारा भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) याने एमए चिदंबरम स्टेडियमवर 1998 च्या कसोटी सामन्यात तेंडुलकर-वॉर्नच्या लढतीबद्दलचा कधी न ऐकलेला किस्सा सांगितला. भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटीच्या आठवणी लक्ष्मणने आठवल्या जो ‘तेंडुलकर-वॉर्न’ लढाईमधील सर्वोत्कृष्ट मानला गेला. (सचिन तेंडुलकर-ग्लेन मॅकग्रा यांच्यात झाली टक्कर, 1999 अॅडिलेड टेस्ट सामन्याच्या रंजक प्रसंगाची मास्टर-ब्लास्टरला आली आठवण)
त्या सामन्यात भारत पहिल्या डावात केवळ 257 धावांवर ऑलआऊट झाला आणि सचिनने पहिल्या डावात केवळ चार धावांचे योगदान दिले. 'क्रिकेट कनेक्ट' कार्यक्रमात लक्ष्मण म्हणाला, "सचिनने चेन्नई कसोटी सामन्यासाठी चांगली तयारी केली होती. पहिल्या डावात तो केवळ चार धावा करून बाद झाला. त्याने चौकार ठोकला आणि त्यानंतर पुढच्याच चेंडूवर मार्क टेलरकडे झेलबाद झाला." लक्ष्मण म्हणाला, "मला आठवते जेव्हा सचिनने स्वत:ला फिजिओच्या खोलीत बंद केले आणि सुमारे एक तासानंतर तो बाहेर आला. जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्याचे डोळे लाल झाले होते. मला वाटले की तो खूप भावनिक आहे, कारण जेव्हा ज्याप्रकारे बाद झाला त्याबद्दल तो खूप नाराज होता."
लक्ष्मण पुढे म्हणाला, “त्यानंतर दुसऱ्या डावात सचिनने जोरदार खेळी केली आणि लेग स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करणार्या शेन वॉर्नचा सामना केला. वॉर्न क्रीजच्या दीपनेसचा वापरत होता, परंतु सचिनने चेंडूला मिड-ऑफ आणि मिड-ऑनवर मारला आणि त्याने पुन्हा शतक ठोकले. वार्नसह त्याचा मकाबला सर्वोत्कृष्ट राहिला आहे.” दुसर्या डावात सचिनने नाबाद 155 धावा केल्या. भारताने तो सामना 179 धावांनी जिंकला.