गोठवून टाकणाऱ्या थंडीत भारतीय जवानाने साजरा केला वाढदिवस (Photo Credit: Twitter)

भारतीय संघाचा माजी सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आपल्या हटके ट्विटसाठी नेहमी चर्चेत असतो. आणि त्याने पुन्हा एकदा आपल्या ट्विटने सर्वांना निशब्द करून टाकले आहे. सेहवागने एका आर्मी जवानाचा (Army Jawan) गोठवून टाकणाऱ्या थंडीत वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ शेअर केला आणि भारतीय सशस्त्र दलाच्या (Armed Forces) जवानांना त्यांच्या बलिदान आणि प्रतिकूल परिस्थितीत लचकपणाबद्दल सॅल्यूट केले. सेहवागने सोशल मीडियावर शेअर केलेल्या जवानाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन व्हिडिओमध्ये एक सैनिक 'बर्फाचा-केक' कापून आपल्या साथीदाराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमलेले दिसत आहेत. सशस्त्र सैन्याचे अभिवादन करीत सेहवाग म्हणाला की, 'आईस केक'चे सौंदर्य केवळ एका सैनिकालाच ठाऊक असू शकते आणि त्यांच्या सर्वोच्च बलिदान आणि लचकपणाचे वर्णन करण्यासाठी कोणतेही शब्द पुरेसे नाहीत. (आश्चर्यकारक! 5 वर्षीय मुलाने तज्ञ ऑपरेटरप्रमाणे चालवला JCB, चकित वीरेंद्र सेहवागने व्हिडिओ शेअर करून केले कौतुक, (Watch Video))

“एक सैनीक आपला वाढदिवस साजरा करत आहे. चीज केक वगैरे सारं विसरा. चीजकेक विसरा, स्नो केकचे सौंदर्य, जे फक्त एका सैनिकाला माहित असते. अशा जवानांच्या त्याग आणि लचकतेपुढे शब्दही अपुरे पडतात”, कॅप्शन देत सेहवागने व्हिडिओ पोस्ट केला. दरम्यान, आपल्या शाळेत पुलवामा हल्ल्यातील 'नायकांच्या मुलांना' प्रशिक्षण देणे हे त्याच्यासाठी विशेषाधिकार असल्याचे सेहवागने उघड केले. पुलवामा हुतात्मा राम वकिलचा मुलगा अर्पित सिंह आणि शहीद विजय सोरेनग यांचा मुलगा राहुल सोरेंग हे सेहवाग शाळेत प्रशिक्षण घेत होते. सेहवाग शाळेत मुलांना शिक्षणाबरोबरच खेळ शिकण्यास मदत करण्यावर भर दिला गेला आहे.

पाहा सेहवागने शेअर केला व्हिडिओ:

सेहवागने 1999 ते 2013 पर्यंत 103 कसोटी आणि 251 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वोच्च पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आपल्या यशस्वी कारकीर्दीत त्याने खेळाच्या दोन्ही स्वरुपात 8,000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. सेहवाग एक स्फोटक सलामी फलंदाज फलंदाज म्हणून गणला जात होता ज्याच्यात आपल्या खेळणे सामन्याचा निकाल बदलून टाकण्याची क्षमता होती. सेहवाग टीम इंडियाच्या बऱ्याच मोठ्या विजयाचा एक भाग होता.