वीरेंद्र सेहवागने युवा मुलाचा JCB चालवतानाचा व्हिडिओ शेअर केला (Photo Credits: Twitter)

एका तज्ञप्रमाणे जेसीबी (JCB) चालवत असलेल्या पाच वर्षीय मुलाचा व्हिडिओ टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) शेअर केल्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. राजेश, या युवा मुलाग व्हिडिओमध्ये हेवी मशीन ड्राईव्हिंग व ऑपरेट करताना दिसत आहे. तो सहजतेने वाळूचा ढीग उचलतोय. व्हिडीओ पाहून बरेच लोकं प्रभावित झाले, तर इतरांनी अशा अवजड यंत्रणा चालवणाऱ्या चिमुलक्याबद्दल चिंता व्यक्त केली. या व्हिडिओचा प्रसार आणि समर्थन केल्याबद्दल माजी क्रिकेटपटूवर कित्येकांनी टीका केली. जेसीबी मशीन पाहून बऱ्याच लोकांना घाम सुटतो आणि ऑपरेट करणे फार कठीण मानले जाते. जेसीबी मशीन चालविण्यासाठी विशेष प्रकारचे प्रशिक्षण आवश्यकता असते. परंतु या पाच वर्षीय मुलाने एका कौशल्यपूर्ण चालवताना पाहून तुम्हीही चकित व्हाल. (लडाखमध्ये शाहिद झालेल्या जवानाचे वडील म्हणाले, 'नातवंडांनाही लढायला पाठवणार'; वीरेंद्र सहवागने व्हिडिओ शेअर करत ठोकला कडक सॅल्यूट)

ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून वीरूने या छोट्या ऑपरेटरची प्रशंसा केली. सेहवागने शेअर केलेल्या त्या दोन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये एक माणूस या जेसीबी तज्ञाची मुलाखत घेत आहे. हा मुलगा पाहिलीत शिकतो आणि मशीन चालवण्यात तो तज्ञ आहे. हा व्हिडिओ कोठला आहे हे अद्याप माहित नाही, पण सेहवागने प्रतिभा आणि आत्मविश्वासाचे उदाहरण म्हणून व्हिडिओ शेअर केला. पाहा हा चकित करणारा व्हिडिओ:

पाहा यूजर्सच्या प्रतिक्रिया:

धोकादायक आहे…

चुकीचे सर…

भारतात बरीच प्रतिभा आहे

परवाना कुठे आहे

अविश्वसनीय!

दरम्यान, मुलाने मशीन चालवणे धोकादायक आहे आणि ही बाब लक्षात ठेवत सेहवागने अपील केले की, "मी युवा वयात कोणालाही हा प्रयत्न करण्याचा सल्ला देणार नाही, परंतु कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकलो नाही."