Virat Kohli (Photo Credit - Twitter)

IND vs AFG 2nd T20: भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळला गेला. जो टीम इंडियाने 6 विकेट्सने जिंकला होता. या विजयासह टीम इंडियाने (Team India) मालिकेतही 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या टी-20 मालिकेसाठी विराट कोहलीचाही (Virat Kohli) संघात समावेश करण्यात आला आहे, मात्र विराट कोहली पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. त्यानंतर विराट दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी उपलब्ध असेल अशी अपेक्षा आहे. कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाल्यानंतर कोणता खेळाडू संघाबाहेर राहणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. (हे देखील वाचा: Rohit Sharma New Record T20: रोहित शर्मा शून्यावर बाद, तरीही टी-20 मध्ये केला मोठा विक्रम)

विराटच्या पुनरागमनाने तिलक वर्मा जावू शकतो बाहेर

पहिल्या टी-20 सामन्यात डावखुरा फलंदाज तिलक वर्माचाही प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. पहिल्या सामन्यात तिलकाची कामगिरी काही विशेष नव्हती. त्याला फलंदाजीत चांगली सुरुवात झाली पण त्याला ही लय शेवटपर्यंत राखता आली नाही. पहिल्या टी-20 सामन्यात तिळक वर्माने 22 चेंडूत 26 धावा केल्या. आपल्या खेळीदरम्यान टिळक वर्माने 2 चौकार आणि 1 षटकार लगावला. आता टिळक वर्माला दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, विराट कोहली दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करेल, त्यानंतर कर्णधार रोहित शर्माला संघात बदल करावा लागणार आहे.

पहिला सामना 6 गडी राखून जिंकला

भारतीय संघाने पहिला सामना 6 गडी राखून जिंकला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने 5 गडी गमावून 158 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून फलंदाजी करताना मोहम्मद नबीने सर्वाधिक 42 धावांची खेळी केली. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी 2-2 बळी घेतले. टीम इंडियाने 159 धावांचे लक्ष्य 17.3 षटकात 4 गडी गमावून पूर्ण केले. भारतीय संघाकडून शिवम दुबेने सर्वाधिक 60 धावांची खेळी केली.