Mohammed Siraj On Virat Kohli: ऑस्ट्रेलिया फलंदाजांचे कंबरडे मोडणाऱ्या मोहम्मद सिराजला विराट कोहली काय म्हणाला होता? महत्वाची माहिती आली समोर
Mohammed Siraj, Virat Kohli (Photo Credit: Twitter)

नुकताच भारतीय संघ आपल्या मायदेशी परतला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकदिवसीय मालिका गमवल्यानंतर भारतीय संघाने टी-20 आणि कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करून दाखवली आहे. दरम्यान, कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचे कंबरडे मोडणारा भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) अधिक चर्चेत आला आहे. त्याच्या कामगिरीचे सर्व स्तरावरून त्याचे कौतूक होत आहे. कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) त्याला काय म्हणाला होता? याबाबत त्याने महत्वाची माहिती दिली आहे. दरम्यान, माझ्याकडे चांगली कामगिरी करण्याची क्षमता असल्याचे म्हणत विराटने माझ्यावर विश्वास दाखवला, असेही सिराज म्हणाला आहे.

आरसीबी आणि विराट कोहली यांनी माझ्यावर नेहमी विश्वास दाखवला. आयपीएलच्या अकराव्या हंगामात मला चांगली कामगिरी बजावता आली नाही. मात्र, तरीदेखील आरसीबीच्या संघाने मला संधी दिली. विराट भाई नेहमी मला म्हणायचे की, तुझ्याकडे उत्कृष्ट कामगिरी करण्याची क्षमता आहे. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेनंतर माझा आत्मविश्वास वाढला आहे. यामुळे मला इंग्लंविरुद्ध कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करण्यासाठी मदत मिळणार आहे, असे सिराज पत्रकारांशी बोलताना म्हणाला आहे. हे देखील वाचा- IPL 2021 Auction: आयपीएल लिलावात स्टिव्ह स्मिथसाठी हे 3 संघ लगावू शकतात बोली, चॅम्पियन टीमही आहे शर्यतीत

सिराज भारतासाठी चांगली कामगिरी बजावून दाखवेल, असा विश्वास त्याच्या वडिलांना होता. यामुळे सिराजच्या वडिलांनी रिक्षा चालवून सिराजचे क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न साकारले. रणजी ट्राफीच्या मागील हंगामात हैदराबादकडून खेळत असताना सिराजने 41 विकेट्स पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर आयपीएलच्या मागील हंगामातही त्याने दमदार कामगिरी बजावली. या कामगिरीच्या जोरावर त्याची ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली होती.