IPL 2021 Auction: राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) बुधवारी आगामी मोसमासाठी स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याच्यासोबत आयपीएल (IPL) करार संपविण्याचा मोठा निर्णय घेतला. उदघाट्न हंगामातील चॅम्पियन संघाचा कर्णधार स्मिथचा 2020 हंगामात कर्णधार आणि फलंदाज कमकुवत प्रभाव ठळकपणे दिसून आला व ‘तीव्र चर्चेनंतर’ त्याची साथ सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) मिनी लिलाव होणार असून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्मिथ एक आकर्षक खेळाडू असेल. 2018 मध्ये राजस्थानने स्पर्धेच्या मध्यभागी अजिंक्य रहाणेच्या जागी स्मिथला रॉयल्स संघाचा कर्णधार म्हणून बढती दिली आणि आता दोन हंगामानंतर स्मिथला युवा प्रतिभावान संजू सॅमसनसाठी मार्ग मोकळा करण्यास सांगितले. राजस्थान रॉयल्सने आगामी लिलावासाठी आपल्या शिल्लक पर्सची किंमत 34.85 कोटी रूपये इतकी वाढविली असली तरी आयपीएल 2021 च्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या रन मशीनसाठी बोली लागवण्याची शक्यता कमीच आहे. (IPL 2021: आयपीएल फ्रँचायझींनी 56 खेळाडूंना केले रिलीज, Release व Retain केलेल्या खेळाडूंची संपूर्ण लिस्ट; कोणत्या संघाकडे किती रक्कम पहा)
अशास्थिती आज आपण जाणून घेऊया आगामी आयपीएल 2021 लिलावात कोणता संघ स्मिथसाठी बोली लागावी शकतो.
1. किंग्ज इलेव्हन पंजाब
केएल राहुलच्या नेतृत्वातील किंग्ज इलेव्हन पंजाबने ग्लेन मॅक्सवेल आणि शेल्डन कॉटरेलला रिलीज केले. 2020 आवृत्तीत मॅक्सवेलला एकही षटकार ठोकता आले नाही, तर वेगवान गोलंदाज कॉटरेलला राहुल तेवतियाने एकच ओव्हरमध्ये पाच षटकार ठोकले. KXIP ला तडाखेदार फलंदाजाची आवश्यकता असताना 8 संघांमधील सर्वाधिक रक्कम शिल्लक असलेला पंजाब संघ स्मिथसाठी बोली लगावू शकतो.
2. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने लिलावात राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधाराला विकत घ्यायचा विचार केल्यास आयपीएलच्या पुढील आवृत्तीत स्मिथ आणि विराट कोहली त्याच संघाकडून खेळताना दिसतील. आरसीबीने क्रिस मॉरिस, मोईन अली, शिवम दुबे आणि ऑस्ट्रेलियन मर्यादित ओव्हर कर्णधार आरोन फिंच यांना मुक्त केले असून आगामी लिलावाचा ते पूर्ण फायदा करू घेऊ इच्छित असतील. आरसीबीला टॉप-ऑर्डर किंवा मधल्या फळीतील फलंदाजाची गरज आहे व स्मिथ यासाठी योग्य दिसत आहे.
3. चेन्नई सुपर किंग्स
राइजिंग पुणे सुपरजायंटचे दोन माजी खेळाडू पुन्हा एकदा एकमेकांसोबत खेळताना दिसतील. शेन वॉट्सनने निवृत्ती घेतल्याने चेन्नई सुपर किंग्सला टॉप-ऑर्डरमध्ये आक्रमक फलंदाजाची गरज आहे आणि सीएसकेने करार केल्यास एमएस धोनी स्मिथचा चांगला उपयोग करू घेऊ शकतो. पीयूष चावला आणि दिग्गज हरभजन सिंह यांची साथ सोडल्यावर एका ऑफस्पिनरशिवाय सीएसके आयपीएलच्या लिलावात स्मिथसाठी बोली लावण्याच्या शर्यतीत देखील उतरू शकतो.