IPL 2021: आयपीएल फ्रँचायझींनी 56 खेळाडूंना केले रिलीज, Release व Retain केलेल्या खेळाडूंची संपूर्ण लिस्ट; कोणत्या संघाकडे किती रक्कम पहा
आयपीएल 2020 ट्रॉफी (Photo Credit: Instagram/iplt20)

20 जानेवारीच्या संध्याकाळी 2021 च्या मोसमाच्या लिलावापूर्वी इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) फ्रँचायझींनी खेळाडू कायम ठेवलेल्या आणि जाहीर केलेल्या खेळाडूंची यादी झाली केली. क्रिकेट चाहत्यांना चकित करत फ्रँचायझींनी अनेक मोठ्या खेळाडूंची साथ सोडली. क्रिस मॉरिस आणि स्टीव्ह स्मिथ यासारख्या काही खेळाडूंना लिलाव पूलमध्ये सोडल्यानंतर आणि क्रिस जॉर्डन, क्रिस लिन, अँड्र्यू टाय यांच्यासारख्या इतर खेळाडूंना कायम ठेवल्यानंतर काही फ्रँचायझीच्या धोरणांवरही प्रश्नचिन्ह लागले. फ्रँचायझींनी पुढील हंगामात त्यांची रणनीती अखंडित ठेवली आहे ज्यात मिनी लिलाव होईल. आयपीएल (IPL) 2022 हंगामात 9 किंवा 10 संघांसाठी मेगा लिलाव होणार असल्यावरूनही काही खेळाडूंना कायम ठेवण्याच्या निर्णयावरही परिणाम झाला आहे असे दिसत आहे. आयपीएलचा लिलाव पुढील महिन्यात होणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या लिलावापूर्वी राखून ठेवलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे. (IPL 2021 Auction: भारताविरुद्ध मालिका पराभवानंतर आयपीएल मध्येही ऑस्ट्रेलियाची घसरण! स्मिथ, मॅक्सवेल, फिंच, पॅटिन्सन यांना फ्रँचायझींचा ‘बाय-बाय’)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी):

रिटेन खेळाडू- विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिक्क्ल, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, केन रिचर्डसन, अ‍ॅडम झांपा, जोश फिलिप, शाहबाज अहमद आणि पवन देशपांडे.

रिलीज खेळाडू –आरोन फिंच, क्रिस मॉरिस, इसरू उडाना, मोईन अली, पवन नेगी, गुरकीत सिंह मान, शिवम दुबे, डेल स्टेन, पार्थिव पटेल आणि उमेश यादव.

राजस्थान रॉयल्स (आरआर):

रिटेन खेळाडू- संजू सॅमसन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, रियान पराग, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, महिपाल लोमरोर, कार्तिक त्यागी, अँड्र्यू टाय, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, यशस्वी जयस्वाल, अनुज रावत, डेविड मिलर, मनन वोहरा , रॉबिन उथप्पा.

रिलीज खेळाडू –स्टीव्ह स्मिथ, अंकित राजपूत, ओशेन थॉमस, आकाश सिंह, वरुण आरोन, टॉम कुरन, अनिरुद्ध जोशी, शशांक सिंह.

दिल्ली कॅपिटल्स (डीसी):

रिटेन खेळाडू- शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, अमित मिश्रा, इशांत शर्मा, आर अश्विन, ललित यादव, हर्षल पटेल, अवेश खान, प्रवीण दुबे, कगिसो रबाडा, एनरिच नॉर्टजे, मार्कस स्टोनिस, शिमरॉन हेटमीयर, क्रिस वोक्स, डॅनियल सॅम्स.

रिलीज खेळाडू - मोहित शर्मा, तुषार देशपांडे, कीमो पॉल, संदीप लामिछाने, अ‍ॅलेक्स कॅरी, जेसन रॉय.

कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर):

रिटेन खेळाडू - इयन मॉर्गन (कॅप्टन), दिनेश कार्तिक, नितीश राणा, शुभमन गिल, रिंकू सिंह, राहुल त्रिपाठी, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, पॅट कमिन्स, प्रसिद्धि कृष्णा, संदीप वारियर, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, सुनील नरिन, टिम सेफर्ट.

रिलीज खेळाडू - टॉम बंटन, ख्रिस ग्रीन, निखिल नाईक, सिद्धार्थ एम आणि सिद्धेश लाड.

सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच):

रिटेन खेळाडू- डेविड वॉर्नर (कॅप्टन), अभिषेक शर्मा, बेसिल थंपी, भुवनेश्वर कुमार, जॉनी बेयरस्टो, केन विल्यमसन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, रशीद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन , विजय शंकर, रिद्धिमान साहा, अब्दुल समद, मिचेल मार्श, जेसन होल्डर, प्रियांम गर्ग, विराट सिंह.

रिलीज खेळाडू- संजय यादव, बी संदीप, बिली स्टॅनलेक, फॅबियन अ‍ॅलन, यरा पृथ्वीराज.

किंग्ज इलेव्हन पंजाब (केएक्सआयपी):

रिटेन खेळाडू - केएल राहुल, क्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, मनदीप सिंह, सरफराज खान, दीपक हूडा, प्रभिसिमरन सिंह, मोहम्मद शमी, क्रिस जॉर्डन, दर्शन नलकंडे, रवि बिश्नोई, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंह, हरप्रीत ब्रार, ईशान पोरेल.

रिलीज खेळाडू - ग्लेन मॅक्सवेल, करुण नायर, हार्दस विल्जॉइन, जगदीशा सुचित, मुजीब उर रहमान, शेल्डन कॉटल, जिमी नीशम, कृष्णाप्पा गौथम, तजिंदर सिंह.

चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके):

रिटेन खेळाडू- महेंद्र सिंह धोनी, सुरेश रैना, अंबाती रायडू, एन जगदीसन, फाफ डु प्लेसिस, रुतूराज गायकवाड, सॅम कुरन, रवी जडेजा, ड्वेन ब्रावो, मिचेल सॅटनर, जोश हेजलवुड, शार्दुल ठाकूर, कर्ण शर्मा, केएम आसिफ, इमरान ताहिर, आर. साई किशोर, दीपक चाहर, लुंगी एनगीडी.

रिलीज खेळाडू - केदार जाधव, पीयूष चावला, मुरली विजय, मोनू कुमार, हरभजन सिंह, शेन वॉटसन (निवृत्त)

मुंबई इंडियन्स (एमआय):

रिटेन खेळाडू - रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, क्रिस लिन, अनमोलप्रीत सिंह, सौरभ तिवारी, आदित्य तरे, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, अनुकुल रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी, आणि मोहसीन खान.

रिलीज खेळाडू - लसिथ मलिंगा (सेवानिवृत्त), मिच मॅकक्लेनाघन, जेम्स पॅटिन्सन, नॅथन कुल्टर-नाईल, शेरफेन रदरफोर्ड, प्रिन्स बलवंत राय, दिग्विजय देशमुख.

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी प्रमुख खेळाडूंना बाहेर केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सकडे एकूण 22.9 कोटी, आरसीबीकडे 35.7 कोटी, राजस्थान रॉयल्सकडे 34.85 कोटी, पंजाब फ्रँचायझीकडे 53.2 कोटी, पाचवेळा आयपीएल विजते मुंबई इंडियन्सकडे 15.35 कोटी, हैदराबादकडे 10.75 कोटी, नाईट रायडर्सकडे 10.85 कोटी आणि आयपीएल 2020 चे उपविजेते दिल्ली कॅपिटल्सकडे 9 कोटी रुपये शिल्लक आहेत ज्याचा वापर करून सर्व फ्रँचायझी आगामी लिलावात खेळाडूंना खरेदी करण्यात करू शकतात.