IPL 2021 Auction: भारताविरुद्ध मालिका पराभवानंतर आयपीएल मध्येही ऑस्ट्रेलियाची घसरण! स्मिथ, मॅक्सवेल, फिंच, पॅटिन्सन यांना फ्रँचायझींचा ‘बाय-बाय’
स्टिव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल (Photo Credit: PTI)

IPL 2021 Auction: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या मिनी लिलावापूर्वी खेळाडूंना कायम ठेवण्याची अंतिम मुदत जवळ असल्याने फ्रँचायझींनी बुधवारी लिलावापूर्वी पर्समधील रक्कम वाढवण्यासाठी संबंधित काही खेळाडूंची साथ सोडली. आयपीएल (IPL) 2021 साठी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या मिनी लिलावासाठी फ्रँचायझी संघाला बळकटी देण्याचा विचार करीत आहेत. अशास्थितीत फ्रँचायझींकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही मोठ्या नावांना सोडचिट्ठी देण्यात आली ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया (Australia) खेळाडूंना मोठा फटका बसला आहे. भारताविरुद्ध नुकतीच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिका गमावल्यावर कांगारू खेळाडूंची आयपीएलमधील मागणीही घसरली आहे. स्टीव्ह स्मिथ (Steve Smith), आरोन फिंच, ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) या ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख खेळाडूंची त्यांच्या फ्रँचायझींनीं हकालपट्टी केली आहे. 31 वर्षीय स्मिथने मागील हंगामात संघाचे नेतृत्व केलं. एक फलंदाज आणि कर्णधार म्हणून तो पूर्णत: अपयशी ठरला. संघाने प्ले-ऑफ गाठले नाहीच तर पॉईंट्स टेबलमधेही राजस्थान रॉयल्सला अखेरच्या स्थानावर समाधान मानावे लागले. (MI Squad for IPL 2021: मिनी लिलावाच्या पार्श्वभूमीवर Mumbai Indians संघाने जाहीर केली Retained आणि Released खेळाडूंची यादी; पहा कोणाला मिळाले स्थान)

आयपीएलमध्ये एकेवेळी सर्वात महागडा खेळाडू ठरलेला ग्लेन मॅक्सवेलला किंग्स इलेव्हन पंजाबने बाहेरचा रास्ता दाखवला. मॅक्सवेलने भारताविरुद्ध वनडे आणि टी-20 मध्ये नावाला साजेशी कामगिरी केली असली तरी ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील फलंदाजाला मागील हंगामात एकही षटकार लगावता आला नाही ज्याचा पंजाबला मोठा फटका बसला परिणामी त्यांनी जवळचे सामने गमावले. शिवाय, आयपीएलचे पाच वेळा विजेते मुंबई इंडियन्सने देखील ऑस्ट्रेलियाच्या जेम्स पॅटिन्सन, नॅथन कोल्टर-नाईल यांनाही संघातून काढले आहे. दरम्यान, कांगारू संघाच्या या मुख्य खेळाडूंना वगळता अ‍ॅलेक्स कॅरी, बिली स्टॅनलेक आणि क्रिस ग्रीन यांनाही त्यांच्या फ्रँचायझीने वगळले आहे.

आता फ्रँचायझीने रिलीज केलेले सर्व खेळाडूंचा लिलाव केला जाईल. फेब्रुवारी महिन्यात मिनी-लिलाव केला जाईल तर मार्च महिन्यात आयपीएलची सुरुवात होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा ही भारतात होणार अशीही चर्चा रंगली आहे. मात्र, स्पर्धा आयोजित केल्यास चाहत्यांना स्टेडियममध्ये परवानगी मिळते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.