TikTok: सोशल मीडियावर विराट कोहली च्या टिक टॉक व्हिडिओ ची धूम, पहा (Video)
विराट कोहली (Photo Credit: Ennui Malik/ Twitter)

PUBG मोबाईल गेम नंतर 'टिक-टॉक' (Tik Tok) व्हिडिओ ने सर्वांना भुरळ पडली आहे. 2019 साली या अॅपची लोकप्रियता प्रचंड वाढली. मोबाईलवर छोटे-छोटे व्हीडियो बनवण्यासाठी टिकटॉक हे अमर्यादित आहे. भारतात टिकटॉक 10 कोटींपेक्षा जास्त मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर कित्येक 'टिक-टॉक' व्हिडिओ वायरल झाले आहे. सध्या सोशल मीडियावर विराट कोहली (VIrat Kohli) याचा 'टिक-टॉक' व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे. विश्वचषकमधील भारताचे आवाहन संपुष्टात आले आहे. आणि विराट आपली पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सह इंग्लंड (England) मध्ये भ्रमंतीसाठी निघाला आहे. अनुष्कासोबत थोडा वेळ काढून विराटने आपला एक टिक टोक विडिओ बनवला आहे. (म्हातारपणात असे दिसतील विराट कोहली, रोहित शर्मा; Netizens नी FaceApp challenge द्वारे शेअर केलेले फोटो पाहून तुम्हाला देखील वेड लागेल)

वेस्ट इंडिज मालिकाआधी विराट आपला पूर्ण वेळ पत्नी अनुष्काला देतोय. मागील किती दिवसांपासून विराट-अनुष्काचे इंग्लंडमधील फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आहे आणि चाहत्यांना ते आवडत देखील आहे. दरम्यान, विराटचा हा टिक टॉक विडिओ देखील खास आहे. पण एक मिनिट, या व्हिडिओमध्ये विराट स्वतः नसून त्याच्या सारखा दिसणारा दुसरा कोणतीतरी आहे. हा व्हिडिओमध्ये असलेली व्यक्ती आणि विराट यांच्यातील साम्य पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. पहा हा भूरळ पडणारा व्हिडिओ:

दुसरीकडे, विश्वचषकच्या सेमीफायनलमध्ये पराभवाला सामोरे गेलेली टीम इंडियामध्ये दोन गट पडल्याचे बोलले जात आहे. विराटकडून वनडे आणि टी-20 मधील कर्णधार पद काढून घेण्याचे देखील बोलले जात आहे. सध्या बीसीसीआय (BCCI) कडून मर्यादित ओव्हर्सच्या सामन्यांसाठी आणि टेस्ट सामन्यांसाठी वेगवेगळे कर्णधार नेमण्याचा विचार सुरू आहे.