म्हातारपणात असे दिसतील विराट कोहली, रोहित शर्मा; Netizens नी FaceApp challenge द्वारे शेअर केलेले फोटो पाहून तुम्हाला देखील वेड लागेल
Fans use photo editing software on cricket stars (Photo Credits: Facebook)

आपण उतारवयात कसे दिसू याची सर्वांना जाणीव करून घ्यायची असते. सध्या सोशल मीडियावर फेसअँप चॅलेंज (Faceapp Challenge) ने सर्वाना खूळ लावलीय. जो तो बघो तो या चॅलेंज द्वारे आपले वृद्ध वयाचे फोटो शेअर करताहेत. याचाच एक भाग म्हणून चाहत्यांनी भारतीय संघ आणि अन्य क्रिकेटपटूंचे म्हातारपणातील फोटो व्हायरल करून टाकले आहेत. यंदाच्या आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमध्ये 10 देशांच्या क्रिकेटखेळाडूंनी साखळी सामन्यापासून ते अंतिम सामन्यापर्यंत सर्वच सामने गाजवले. पण, सध्या सोशल मीडियावर विश्वचषक गाजवणाऱ्या या खेळाडूंचे चेहरे पाहून तुम्हालाही वेड लागेल. (टीम इंडियाच्या वनडे संघात रोहित शर्मा-शिखर धवन नंतर सलामीसाठी या 5 खेळाडूंचा करू शकतात विचार)

खेळाडूंचे हे फोटोज विश्वचषक फोटोशूटच्या वेळी काढण्यात आले होते, परंतु कोणीतरी आगळा-वेगळा विचार त्यांच्या या फोटोज ना भन्नाटपणे रूपांतरित केले. चाहत्यांनी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson), ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (David Warner)आणि स्टीव्ह स्मिथ (Steve Smith), ख्रिस गेल (Chris Gayle), ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell), रशीद खान (Rashid Khan), श्रीलंकाचा लसिथ मलिंगा (Lasith Malinga)आणि काही इतर खेळाडूंवर या अॅपचा वापर केला आणि त्याचा परिणाम पाहून तुम्हाला देखील वेड लागेल. पहा हे वायरल फोटोज:

दरम्यान, काही खेळाडू, शिखर धवन (Shikhar Dhawan), युझवेन्द्र चहल (Yuzvendra Chahal) यासारख्यांनी स्वतः या अॅपचा वापर करत आपले म्हतारपणाचे फोटो शेअर केले आहे. या सर्वे खेळाडूंचे हे फोटोज सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. सध्या सर्वे खेळाडू दीड महिन्याच्या विश्वचषकानंतर विश्रांती करताना दिसताहेत.

 

View this post on Instagram

 

"Insaaf hoga, hum karenge insaaf. Abhi hum zinda hai.😜😄"

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

 

View this post on Instagram

 

Old is Gold 😂 #2060

A post shared by Yuzvendra Chahal (@yuzi_chahal23) on