टीम इंडियाच्या वनडे संघात रोहित शर्मा-शिखर धवन नंतर सलामीसाठी या 5 खेळाडूंचा करू शकतात विचार
रोहित शर्मा आणि शिखर धवन (AP/PTI Photo)

भारतीय संघात (Indian Team) फलंदाजीची सुरुवात करण्यासाठी फलंदाजांची कमतरता नाही. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये आपले काम चोख बजावत आहे. दोघांपैकी एकाला दुखापत झाल्यास पर्याय म्हणून के एल राहुल (KL Rahul) देखील आहे. यंदाच्या आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषक सामन्यात धवनला दुखापत झाल्यानंतर राहुल त्याच्या जागी रोहितसोबत सलामीला आला होता. यावेळी राहुलची कामगिरी देखील बघण्यासारखी होती. रोहितसह सलामीला येत त्याने 360 धावा केल्या आणि संघाला चांगली सुरुवात करून देण्यास सहकार्य केले. (हे 3 भारतीय क्रिकेटपटू 2020 च्या आयसीसी टी-20 विश्वचषकसाठी टीम इंडियाचा भाग नसतील)

सध्याचे दृश्य पाहता भविष्यासाठी एक आणि दोन क्रमांकाच्या फलंदाजीसाठी काळजी करण्याचे कारण नाही. पण टीम इंडियाचे पूर्णतः पॅक क्रिकेट कॅलेंडर पाहता खेळाडूला नियमितपणे दुखापत होऊ शकते. भारतीय संघ व्यवस्थापनाने पूर्व तयारी करत खेळाडूंना तयार करणे गरजेचे आहे. राहुल मोठ्या संघांविरूद्ध विजय मिळविण्यास अपयशी ठरला. त्यामुळे राहुलवर अवलंबून न राहता भारताने काही अन्य खेळाडूंना पर्याय म्हणून विचारात घेण्याची गरज आहे. या 5 खेळाडूंचा सलामीसाठी विचार केला जाऊ शकतो:

संजू सॅमसन (Sanju Samson)

संजू सॅमसन (Photo Credit: Sanju Samson/Instagram)

केरळचा युवा फलंदाज संजू सॅमसन याने 2013 च्या आयपीएल (IPL) मधील आपल्या कामगिरीने चाहत्यांच्या मनात घर केले. 2013 पासून सॅमसनने मर्यादित ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) साठी सलामीला येणार सॅमसन सावध पण आक्रमक खेळीची ओळखला जातो आणि त्याचे हे गन त्याला मर्यादित षटकांच्या सामन्यात सर्वोत्तम खेळाडू बनवतात. तो आपले डोकं शांत ठेवून फलंदाजी करतो आणि कोणत्याही वेळी गियर बदलण्याची क्षमता आहे. त्याची हि क्षमता त्याला भविष्यकाळात हे एक विश्वासार्ह सलामीवीर बनवू शकते. त्याची विकेट कीपिंग कौशल्य देखील प्रभावी आहेत आणि म्हणूनच नजीकच्या काळात तो भारतीय संघाचा एक भाग असेल यात शंका नाही.

पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) 

File Image | पृथ्वी शॉ | Indian Cricket Team | (Photo Credits: Getty Images)

आयपीएल आणि वेस्ट इंडिज विरुद्ध मालिकेत यशस्वी कामगिरी करत मुंबईच्या या युवा फलंदाजाने चाहत्यांच्या मनावर छाप सोडली आहे. त्याने आधीच भारताच्या राष्ट्रीय संघात पदार्पण केले आहे आणि याची सुरुवात त्याने संस्मरणीय शतकाची केली. शॉने भारतासाठी वेस्ट इंडीज विरूद्ध 2 टेस्ट सामने खेळले आहेत, पण अद्याप तो वनडे सामना खेळला नाही. शॉ एक अत्यंत आक्रमक फलंदाज आहे आणि त्याला सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांचे मिश्रण मानले जाते. पण त्याचे खेळण्याचे तंत्र अजून पूर्णपणे विकसित झालेले नाही आणि हे त्याने विचारात घ्यायची गरज आहे. शॉ हा भारतीय संघातील भविष्याचा स्टार मानला जात आहे आणि निवड समिती त्याला योग्य तो मार्गदर्शन देत रोहित आणि शिखर यांच्या जागी सलामीला उतरवले.

शुभमन गिल (Shubhman Gill)

शुभमन गिल (Photo Credit: Shubhman Gill/Instagram)

पृथ्वी शॉ प्रमाणेच गिल देखील भारताच्या अंडर-19 विश्वचषकमधून उदय झालेला स्टार आहे. शॉच्या आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या दोन महिन्यांनी पदार्पण केले. शुभमनने न्यूझीलंड मध्ये भारतासाठी दोन वनडे सामने खेळले आणि त्यात त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही. पण त्याची नैसर्गिक प्रतिभा त्याला भविष्यात कर्णधार विराट कोहली पेक्षा जास्त फायदा देऊ शकतो. यंदाच्या आयपीएल मध्ये शुभमन कोलकता नाइट रायडर्स साठी सलामीला आला होता. एक-दोन सामने वगळता अन्य सामन्यांत त्याने प्रभावी कामगिरी केली आहे. आणि त्याच्यासाठी त्याला यंदाच्या आयपीएलमध्ये 'इमर्जिंग प्लेअर आवार्ड दिला गेलं होता.

मयंक अग्रवाल (Mayank Agarwal)

मयंक अगरवाल (Photo by Nathan Stirk/Getty Images)

मयंक अग्रवाल याला जखमी विजय शंकर याच्या बदल्यात विश्वचषकाच्या भारतीय संघात स्थान मिळाले होते. पण भारताच्या सेमीफायनलमध्ये पराभवामुळे त्याला एकही सामना खेळता आला नाही. गेल्या 12-18 महिन्यांमध्ये तो भारतीय संघात प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्नात आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट मालिकेत पृथ्वी शॉच्या बदल्यात मयंकची निवडही झाली होती. त्याने 2 खेळांमध्ये प्रभावी दिसला आणि त्याने भरपूर आपल्यातले प्रतिभाचे प्रदर्शन केले. 28 वर्षीय मयंकने अद्याप वनडे क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले नाही पण रोहित आणि शिखर यांना बॅक अप म्हणून व्यवस्थापनाने त्याला पाठिंबा दिला आहे.

रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad)

रुतुराज गायकवाड (Photo Credit: Ruturaj Gaikwad/Instagram)

रुतुराज गायकवाड हा अद्याप क्रिकेट जगातला ओळखीचा नाही. तो फक्त 22 वर्षांचा आहे. शिवाय तो पूर्णपणे विकसित खेळाडू नाही. पण त्याने इतक्या कमी वयात आपली क्षमता दाखवून 'भारत ए' संघासाठी प्रभावी खेळी केली आहे. उजव्या हाताच्या या फलंदाजाने 36 डावांमध्ये 100.93 च्या स्ट्राइक रेटवर 1936 धावा केल्या आहेत. मागील 2 वर्षांत त्यांनी घरगुती क्रिकेटमध्ये महाराष्ट्रासाठी प्रभावी कामगिरी केली आहे आणि सर्व स्वरूपांमध्ये धावांचा पाऊस पडला. आक्रमक फलंदाज म्हणून तो स्वत: ला भविष्यात भारतासाठी एक प्रमुख खेळाडू म्हणून प्रतिष्ठित करू शकतो. आणि अंबाती रायुडू च्या निवृत्तीनंतर सलामीवीर म्हणून चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) साठी त्याला निश्चितच संधी मिळेल.

रोहित आणि शिखरची जोडी सलामीला उत्तम कामगिरी करत आहे. मागील काही वर्षात दोन्ही फलंदाजांनी आपल्याला शोभेल अशी कामगिरी केली आहे. पण जर भारतीय संघाला भाविषयात देखील वनडेमध्ये आपला प्रभाव राखून ठेवायचा असेल तर त्यांची आगामी सलामीजोडी देखील रोहित-शिखर एवढीच प्रभावी असली पाहिजे.