Vinod Kambli Struggles to Walk: मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला(Wankhede Stadium) 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अलीकडेच एका भव्य कार्यक्रम पार पडला. यामध्ये मुंबईतील अनेक क्रिकेटपटूंना आमंत्रित करण्यात आले होते. यात सचिन तेंडुलकर, रोहित शर्मापासून ते श्रेयस अय्यरपर्यंत अनेक प्रसिद्ध खेळाडूंनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) देखील उपस्थित होते. तथापि, त्याच्या आजारामुळे त्यांना तेथे चालण्यास अडचण येत होती. पण या काळात त्यांची पत्नी अँड्रिया (Andrea)त्यांचा हात धरून त्यांना आधार देत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
कांबळी पत्नीचा हात धरून चालताना दिसले
भारतासाठी कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही प्रकारात खेळणारे विनोद कांबळी बऱ्याच काळापासून विविध आजारांनी ग्रस्त आहेत. अलिकडेच त्यांची प्रकृती खूपच बिघडली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. काही दिवसांपूर्वी, मुंबई क्रिकेट असोसिएशनने भारतासाठी खेळलेल्या मुंबईच्या क्रिकेटपटूंसाठी एक सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यासाठी वानखेडे येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विनोद कांबळी त्यांची पत्नी अँड्रिया हेविटचा हात धरून वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश करताना दिसले.
View this post on Instagram
२००६पासून कांबळी-अँड्रिया एकत्र
53 वर्षीय कांबळी यांना हृदयविकाराचा झटका, मेंदूत गुठळ्या होणे यासारख्या गंभीर आजारांनी ग्रासले आहे. त्यांनी भारतासाठी कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही स्वरूपात 121 सामने खेळले आहेत. 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळले. त्यांनी एकदिवसीय सामन्यात 2 शतकांसह 2477 धावा केल्या आहेत. 2000 मध्ये त्यांची अँड्रियासोबत भेट झाली. अँड्रिया एक मॉडेल आणि फॅशन डिझायनर आहे. दोघांनीही ६ वर्षे डेटिंग केल्यानंतर 2006 मध्ये लग्न केले. आता त्यांना दोन मुले आहेत.