Valentine's Day Special 2020: क्रिकेट स्टेडियममध्ये रोहित ने केले होते पत्नी रितिका ला प्रपोज, जाणून घ्या 'हिटमॅन'ची लव स्टोरी
रोहित शर्मा, रितिका सजदेह (Photo Credit: Getty And Facebook)

Valentine's Day Special 2020: प्रेम व्यक्त करण्यासाठी एखाद्या विशेष दिवसाची वाट पाहू नये. जर आपण एखाद्यावर प्रेम करत असाल तर शक्य तितक्या लवकर व्यक्त केले पाहिजे.टीम इंडियाचा 'हिटमॅन' रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रितिका सजदेह (Ritika Sajdeh) ची प्रेमकथा प्रेम, एक लांब कोर्टशिप, त्यानंतर एक काल्पनिक प्रस्ताव आणि स्टार-स्टडेड लग्नाने भरपूर आहे. हिटमॅन रोहितला कोणत्याही ओळखीची गरज नाही. आपल्या खेळाच्या बळावर त्याने संपूर्ण जगाला वेड लावले आहे. आज व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने आपण पहिल्या या जोडायची ही अत्यंत सुंदर लव स्टोरी. रितिका आणि रोहित एका शूटिंग दरम्यान भेटले. मॅनेजर नसल्याने रोहितला खूप त्रास होत होता. हे पाहून रितिकाने त्याला मदत केली आणि त्यानंतर हे दोघे जवळ आले. दोघांमध्ये मैत्री झाली ज्याचे नंतर प्रेमात रूपांतर झाले. (Valentine's Day Special 2020: सौरव आणि डोना गांगुली यांची फिल्मी लव स्टोरी, घरच्यांना न सांगता गुपचूप केले होते लग्न)

रोहित आणि रितिकाची पहिली भेट 2009 मध्ये बोरिवली स्पोर्ट्स क्लबमध्ये झाली होती जिथे रोहितने रितिकाला आपला क्रीडा व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले. रितिकाबाबत एक गोष्ट बऱ्याच जणांना माहित नसेल की ती माजी 'सिक्सर किंग' युवराज सिंह याची राखी बहीण आहे. व्यावसायिक संबंधांमुळे, दोघे निरंतर भेटत राहिले. दोघे लग्नापूर्वी 6 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. 6 वर्षांच्या मैत्रीनंतर रोहितने 3 जून 2015 रोजी रितिकाला बोरिवली स्पोर्ट्स क्लबमध्ये लग्नासाठी प्रपोज केले होते. हे तेच मैदान आहे जिथे रोहितने क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्याची सुरुवात केली होती. रोहित हातात एक सॉलिटेअर रिंग घेऊन, गुडघ्यावर बसला आणि तिला लग्नाची मागणी घातली. चकित रितिकाने तो प्रस्ताव मान्य केला आणि हो म्हणाली!

या सुंदर जोडप्याचा 3 जून 2015 रोजी साखरपुडा झाला. आणि नंतर 13 डिसेंबर 2015 मध्ये मुंबईच्या ताज लँड्स हॉटेलमध्ये विवाह बंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी अंबानींनी या जोडप्यांसाठी एक भव्य पार्टी दिली होती. आज दोघांच्या लग्नाला चार वर्ष झाली असून 2018 मध्ये दोघांना पहिल्यांदा पालकत्व अनुभवण्याचा आनंद मिळाला. रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना पत्नी रितिकाने मुंबईत लेक समायरा ला जन्म दिला.