भारत (India)-पाकिस्तानमध्ये (Pakistan) क्रिकेटच्या मैदानावर होणारी स्पर्धा कोणापासून लपलेली नाही. सध्या जरी पाकिस्तान संघाने केवळ भारताला पराभूत करण्याचे स्वप्न पाहिले असले, तरी एक काळ असा होता जेव्हा टीम इंडियाला पाकिस्तानकडून जिंकणे इतके सोपे नव्हते. वनडे सामने असो किंवा कसोटी क्रिकेट भारत-पाकिस्तान टक्कर क्रिकेट क्रिकेट चाहत्यांना रोमांचित करायची. तथापि, आता त्याच जुन्या आठवणींना उजाळा देताना पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि विद्यमान पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांनी एक बालिश विधान केले आहे. इमरान खान व कपिल देव यांच्यापैकी कोण सर्वोत्कृष्ट अष्टपैलू आहे?, बाबर आजम व विराट कोहली मधील सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण आहे? अशा प्रकारे, दोन देशांमधील खेळाडूंमध्ये वारंवार तुलना केली जाते. आता माजी पाकिस्तानी वर्ल्ड कप विजेता कर्णधाराचा एका व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो भारतीय संघाबद्दल काही गोष्टी सांगत आहे. (पाकिस्तानचे माजी कर्णधार इंजमाम उल हक यांनी भारतीय फलंदाजांवर लगावले गंभीर आरोप, वाचा सविस्तर)
या व्हिडिओमध्ये इमरान भारतीय क्रिकेट संघाबद्दल (Indian Cricket Team) सहानुभूती व्यक्त करत आहे आणि असं म्हणत आहे की टीम इंडियाबद्दल मला वाईट वाटते कारण आम्ही त्यांना बर्याचदा पराभूत केले आहे. जेव्हा शारजाहमध्ये सामने व्हायचे तेव्हा आम्ही त्यांना नेहमी पराभूत करायचो असं ते म्हणाले. पंतप्रधान इमरान म्हणाले की, "भारतीय संघाबद्दल मला वाईट वाटायचे कारण आम्ही त्यांना वारंवार पराभूत केले.त्यांच्यावर खूप दबाव होता. जेव्हा मी त्यांच्या कर्णधारासमवेत नाणेफेक करायला जात होतो तेव्हा मी त्याचा चेहरा बघितला असता आणि तो घाबरुन जात होता. त्या काळी आमचे प्रतिस्पर्धी भारत नव्हते." याबाबत पाक पॅशनचे संपादक साज सादिक यांनी इमरानचा संदर्भ घेऊन ट्विट केले आहे.
PM Imran Khan "I used to feel sorry for the Indian team because we beat them so often. They were under a lot of pressure. When I used to go to toss with their captain, I'd look at his face & he would be looking scared. Our rivals in those days weren't India" #Cricket pic.twitter.com/wI2nYb3QFM
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) April 23, 2020
भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये नेहमीच चर्चेचं विषय बनायचे. वर्ल्ड कपमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये नेहमीच भारताचा वरचष्मा राहिला आहे. 2019 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना खेळला गेला. दोन्ही टीम पुन्हा एकदा आशिया चषक स्पर्धेत आमने-सामने येणार आहे. तथापि, जगभरातील परिस्थिती कोरोना विषाणूमुळे गंभीर बनली आहे, त्यामुळे स्पर्धेवर सध्या संभ्रम कायम आहे.