भारतीय क्रिकेट बोर्ड, बीसीसीआयने आज टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) आणि माजी क्रिकेटपटू 'द वॉल' राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा एक फोटो शेअर केला. यावर नेटिझन्सने त्यांना फोटो कॅप्शनने वाईटपणे ट्रोल केले. बीसीसीआयने (BCCI) द्रविड आणि शास्त्री यांच्या फोटो त्यांना ‘ग्रेट’ म्हणून कॅप्शन देत शेअर केला. शास्त्री यांना ‘महान’ असे संबोधले आणि नेटकऱ्यांना हे काही पटले नाही आणि त्यांनी बीसीसीआयला ट्रोल केले. मात्र, द्रविडने क्रिकेटमध्ये देशासाठी केलेल्या योगदानाबद्दल त्याचे कौतुक करत प्रतिक्रिया दिल्या आणि त्याने भारतीय संघाचा कोच बनावे अशी इच्छा व्यक्त केली. द्रविडने भारतीय संघाच्या सराव सामन्यादरम्यान त्यांना भेट दिली. टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकाविरुद्धपुढील सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियम खेळला जाईल. (कोच रवि शास्त्री या फोटो मुळे झाले ट्रोल)
बीसीसीआयने शेअर केलेल्या पोस्टमध्ये शास्त्री आणि द्रविड टीम इंडियाच्या जर्सीमध्ये एकत्र उभे आहेत. बीसीसीआयने कॅप्शन देत लिहिले, "जेव्हा भारतीय क्रिकेटचे दोन महान क्रिकेटपटू भेटले." प्रत्युत्तरादाखल, ट्विटरवर चाहत्यांनी बीसीसीआयला ट्रोल करण्यासाठी मजेदार टिप्पण्या दिल्या. काहींनी केवळ द्रविडला महान म्हणून संबोधले, तर काहींनी शास्त्रीऐवजी माजी भारतीय क्रिकेटपटूला टीम इंडियाचा प्रशिक्षक बनविण्याचा आग्रह धरला. काहींनी बीसीसीआयला शास्त्रीला 'खेद' आणि द्रविडला 'महान' असे संबोधून ट्रोल केले. पहा नेटकऱ्यांनी कशा दिल्या प्रतिक्रिया:
When two greats of Indian Cricket meet 🤝 pic.twitter.com/Vj3bAeGr8y
— BCCI (@BCCI) September 20, 2019
कोच विरुद्ध कोच!
The Coach India wants v The Coach India has!! pic.twitter.com/UeUCWQKXax
— Hariharan Durairaj (@hari_durairaj) September 20, 2019
दुसरा कुठे आहे?
Where is the second great?? Are you blind?
— हे .. केशव !! (@keshav_141) September 20, 2019
अपेक्षा विरुद्ध रियल्टी!
Expectations vs Reality
— Sagar (@sagarcasm) September 20, 2019
अरेरे!
Rahul Dravid is shaping and nurturing cricketing talents whereas Ravi Shastri is making money out of those talents.
— Satyam Singh (@MyFreakyTweets) September 20, 2019
दरम्यान, टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर शास्त्री यांना पुन्हा मुख्य प्रशिक्षकाच्या पदावर नेमण्यात आले आहे. पण, भारतीय क्रिकेट चाहत्यांनी हे पद खराब हाताळल्याबद्दल त्यांना फटकारले. दुसरीकडे, द्रविड साध्य नॅशनल क्रिकेट अकादमी (एनसीए) क्रिकेटचे प्रमुख आहेत. त्यांनी याआधी भारताच्या अंडर-19 टीमच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे. शिवाय, सध्या तो भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा परदेशी फलंदाजी सल्लागार आहे. द्रविडने भारतीय संघाचे कर्णधारपदी भूषवले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25,000 हून अधिक धावा केल्या आहेत.