IND vs AUS Test 2020-21: नवख्या टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव, Netizens मानत आहे राहुल द्रविडचे आभार, पहा Tweets
राहुल द्रविड (Photo Credit: Getty)

IND vs AUS Test 2020-21: आंतरराष्ट्रीय स्तरावरील युवा क्रिकेटपटूंना तयार करण्यासाठी माजी भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या कौशल्याचे सध्या सोशल मीडियावर यूजर्सकडून खूप कौतुक केले जात आहे. टीम इंडियाच्या (Team India) नवोदित खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) ब्रिस्बेन टेस्ट (Brisbane Test) सामन्यात संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. एकेवेळी भारताच्या हातून सामना निसटाना दिसत असताना वॉशिंग्टन सुंदर, रिषभ पंत (Rishabh Pant) , शुभमन गिल (Shubman Gill) यांच्यासारख्या खेळाडूंनी बॅट आणि बॉलने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात मालिकेत दुसऱ्यांदा धूळ चारण्यात महत्वाची भूमिका बजावली. युवा खेळाडू शुभमन आणि पंत सामन्याच्या अंतिम दिवशी संघाला विजयी रेष ओलांडून देण्यात आघाडीवर राहिले. टीम इंडियाच्या (Team India) या विजयासाठी सर्व टीम इंडियाची 'भिंत' म्हणून ओळखले जाणारे द्रविडचे आभार मानत आहे. भारतीय क्रिकेटपटूंना आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज करण्याची जबाबदारी द्रविडकडे होती. (IND vs AUS 4th Test 2021: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टेस्ट सिरीजमध्ये टीम इंडियाच्या रोमांचक विजयाचा हा ठरला टर्निंग पॉईंट, निर्णायक क्षणी बदलला गियर!)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर द्रविडने भारत-अ संघ आणि देशाच्या अंडर-19 क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे. द्रविडच्याच नेतृत्वात भारताने 2018 अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला ज्यामध्ये शुभमन गिलने 6 सामन्यात एकूण 372 धावा केल्या होत्या. इतकंच नाही तर द्रविडने डाऊन अंडर कसोटी मालिका जिंकलेल्या संघातील रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर हनुमा विहारी यांचेही एकेवेळी मार्गदर्शन केलेले आहे. त्यामुळे सध्या भारतीय संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या या खेळाडूंचे मार्गदर्शन केल्याबद्दल यूजर्स द्रविडचे आभार मानत आहेत. पहा ते ट्विट्स:

द्रविडला अभिमान वाटत असेल

खरा सामनावीर!

राहुल द्रविड!

द्रविडसाठी कौतुकास्पद पोस्ट!

धन्यवाद राहुल सर!

प्रशिक्षक अधिक कौतुकास पात्र आहे

कला आणि कलाकार!

भारतीय क्रिकेट सुरक्षित हातात आहे

द्रविडच्या प्रशिक्षणात भारताने अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला आणि त्या संघातील दोन खेळाडूंनी भारताकडून पदार्पण केले. शिवाय, एनसीएचे प्रमुख म्हणून द्रविडच्या प्रभावाचे कौतुक केले गेले आहे कारण यामुळे भारतीय बेंचवर दर्जेदार खेळाडू मिळाले आहेत.नुकत्याच संपुष्टात आलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अनेक ज्येष्ठ खेळाडू दुखापतीमुळे संघ सोडून गेले आहेत पण, संघाने विजयासाठी कडवी झुंज दिली आणि अखेर विजय मिळवला.