विक्रम लँडरनंतर RCB ने NASA कडून विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांनी मारलेले चेंडू शोधण्यासाठी मागितली मदत, Netizens म्हणाले पहिले IPL जिंका
एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने त्याच्या नेतृत्वात भारताला क्रिकेटच्या मैदानात अनेक यश मिळवून दिले आहेत. कोहली भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. कोहलीने जरी भारतासाठी कर्णधारपदाची भूमिका उत्तमपणे बजावली असली तरी इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो आजवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (Royal Challengers Bangalore) जेतेपद मिळवू शकलेला नाही. मंगळवारी आरसीबीने सकाळी कोहलीबद्दल एक ट्वीट केल्यानंतर चाहत्यांनी फ्रँचायझीला ट्रोल केले. मंगळवारी नासाद्वारे भारताच्या चंद्रयान मिशनवरीलविक्रम लँडरचे मलबे सापडले. याच्यानंतर आरसीबीने शुभेच्छा देण्यासाठी  ज्यामध्ये त्यांनी कर्णधार कोहली आणि स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) यांनी मारलेला बॉल शोधण्यासाठी आणि परत मिळवण्यास मदत मागितली. इस्रोच्या (ISRO) महत्वाकांक्षी मिशन चंद्रयान-2 (Chandrayaan) चा विक्रमलँडरचा ढिगारा नासाच्या (NASA) ऑर्बिटर चंद्राच्या पृष्ठभागावर शोधला आहे. नासाने याचे श्रेय चेन्नई येथील मॅनिकल इंजिनीअर शानमुगा सुब्रमण्यम यांना दिले ज्याने प्रथम याची ओळख पटविली. ('विक्रम लँडर'चा शोध लावण्यात भारतीय अभियंत्याचे मोठे योगदान; पहा नक्की कसा शोधून काढला Vikram lander)

आरसीबीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट शेअर केला आणि लिहिले की, "नासाचे अभिनंदन, आमच्या फलंदाजांकडून आम्हाला विशेष विनंती आहे. विक्रम लँडरचा शोध घेणारी नासाची टीम आमच्या फलंदाज एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहलीचे चेंडू शोधण्यात मदत करू शकेल का?" आरसीबीचे हे ट्विट अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण, यानंतर चाहत्यांनी फ्रँचायसीला ट्रोल केले आणि पहिले आयपीएल जिंकायला सांगितले. काहींनी संघाला गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आणि लिहिले की, नासाच्या मदतीने एक चांगला गोलंदाज शोधा तर दुसर्याने म्हटले, कृपया नासाला कप शोधण्यास सांगा, कारण तुम्हाला आयपीएलमध्ये एक कपही मिळणार नाही.

पाहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया:

आरसीबी जिंकू शकेल असे वैकल्पिक विश्व शोधू शकेल का?

कोहली आणि रिषभ पंत केवळ आयपीएलमध्ये षटकार मारताना दिसत आहेत.

परंतु मी मुख्यतः टेबलच्या तळाशी आरसीबी शोधू शकतो

आरसीबी सामने कसे जिंकता येतील ते शोधा

एक उत्तम गोलंदाज शोधा

आयपीएल जिंकण्याचा मार्ग शोधण्यात तुम्हाला एखाद्याची मदत हवी आहे

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आगामी 13 व्या सत्रात आयपीएलच्या (IPL) पहिल्या विजेतेपदासाठी पुन्हा प्रयत्न करणार आहे. न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन यांची क्रिकेट संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली तर ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज सायमन कॅटिच यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. आरसीबीने माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि सहाय्यक प्रशिक्षक आशीष नेहरा यांच्याबरोबर करार रद्द केला. मागील सत्रात आरसीबीने 14 पैकी 5 सामने जिंकले होते.