Trent Boult Retirement News: न्यूझीलंडच्या खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवर स्टार वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने (Treant Boult) मोठी घोषणा केली आहे. तो 17 जून रोजी टी-20 विश्वचषकातील शेवटचा सामना खेळणार आहे. हा त्याचा शेवटचा टी-20 विश्वचषक सामना (Trent Boult Retirement) असेल, असे त्याने स्पष्ट केले आहे. आज न्यूझीलंडने युगांडावर 9 विकेट्सने विजय मिळवला. 2024 टी-20 विश्वचषक स्पर्धेतील न्यूझीलंडचा हा पहिला विजय आहे. 2024 टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघ अफगाणिस्तानविरुद्ध वाईटरित्या पराभूत झाला. यानंतर 'करो या मरो'च्या सामन्यातही किवी संघ वेस्ट इंडिजसमोर 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करू शकला नाही.
Trent Boult has confirmed that he is playing his last #T20WorldCup 🗣
Full story 👉 https://t.co/RWtZOceRNR #NZvUGA pic.twitter.com/jBSrCqXwu2
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 15, 2024
विश्वचषकात न्युझीलंडची खराब कामगिरी
दुसरीकडे, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजने सलग तीन विजयांसह सुपर-8 मध्ये प्रवेश केला आणि किवी संघ टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला. अशा परिस्थितीत संघाची खराब कामगिरी पाहून ट्रेंट बोल्टने तिसऱ्या सामन्यानंतर घोषणा केली की, हा त्याचा शेवटचा टी-20 विश्वचषक आहे. यानंतर तो पुढील टी-20 विश्वचषकात न्यूझीलंड संघाचा भाग असणार नाही. (हे देखील वाचा: T20 WC 2024 Super 8 Scenario: भारतासह सहा संघ सुपर 8 साठी पात्र, या 10 संघांना मिळाले नारळ; जाणून घ्या संपूर्ण समीकरण)
हे पचवणं खूप कठीण आहे - ट्रेंट बोल्ट
न्यूझीलंडला सुपर-8 मध्ये प्रवेश न मिळाल्याबद्दल बोल्ट म्हणाला, "आम्हाला खरोखर ही सुरुवात अजिबात नको होती. हे पचवणं खूप कठीण आहे. आम्ही स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकलो नाही आम्ही सर्वजण निराश आहोत. पण जेव्हा जेव्हा तुम्हाला देशासाठी खेळण्याची संधी मिळाली, हा तुमच्यासाठी अभिमानाचा क्षण असतो.