RR vs GT, IPL 2024 24th Match: आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार रोमहर्षक सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' महान खेळाडूंवर
GT vs RR (Photo Credit: X)

RR vs GT, IPL 2024: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 24 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स (RR vs GT) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना राजस्थानचे होम ग्राउंड असलेल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. आजचा सामना गुजरात टायटन्ससाठी महत्त्वाचा असणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरातने शेवटचे सलग दोन सामने गमावले आहेत. गुजरात टायटन्सने या मोसमात आतापर्यंत 5 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत आणि गुणतालिकेत 4 गुणांसह 7व्या स्थानावर आहे. दुसरीकडे, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने सर्व 4 सामने जिंकले आहेत आणि स्पर्धेत अपराजित आहे. 8 गुणांसह राजस्थान रॉयल्स पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे.

सर्वांच्या नजरा असतील या खेळाडूंवर 

राशिद खान: गुजरात टायटन्सचा स्टार गोलंदाज राशिद खानने राजस्थान रॉयल्सविरुद्ध आतापर्यंत 13 बळी घेतले आहेत. राशिद खान हा खूप अनुभवी खेळाडू आहे. शेवटच्या षटकांमध्येही चांगले फटके मारू शकतो. आजच्या सामन्यात सर्वांच्या नजरा रशीद खानवर असतील.

केन विल्यमसन: गुजरात टायटन्सचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसनचा राजस्थान रॉयल्सविरुद्धचा विक्रम उत्कृष्ट राहिला आहे. केन विल्यमसन या मैदानावरही चांगला आहे. या सामन्यात केन विल्यमसन प्रमुख भूमिका बजावू शकतो.

दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल.

गुजरात टायटन्स : शुभमन गिल, बीआर शरथ/वृद्धिमान साहा, साई सुदर्शन, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, दर्शन नळकांडे, स्पेन्सर जॉन्सन, मोहित शर्मा.