MI vs DC (Photo Credit - Twitter)

MI W vs DC W, WPL 2025: मुंबई इंडियन्स महिला क्रिकेट संघ विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स महिला क्रिकेट संघ महिला प्रीमियर लीग (WPL) 2025 चा दुसरा सामना 15 फेब्रुवारी (शनिवार) रोजी वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. दोन्ही संघांमध्ये शेवटचा सामना 5 मार्च 2024 रोजी झाला होता, जिथे दिल्ली कॅपिटल्सने 29 धावांनी विजय मिळवला होता. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली, मुंबई इंडियन्स उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, घातक गोलंदाज आणि स्फोटक फलंदाजांनी सजलेले आहे. त्याच वेळी, दिल्ली कॅपिटल्स हा आतापर्यंतचा WPL मधील सर्वात मजबूत संघ आहे, परंतु दुर्दैवी देखील आहे. दोन्ही हंगामात, ते पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर होते आणि अंतिम फेरीत पोहचले पण जेतेपद जिंकता आले नाही. यावेळी त्यानां जुन्या चुका दुरुस्त करून ट्रॉफी जिंकायची आहे.

हेड टू हेड (MI W vs DC W Head-To-Head Record In WPL)

महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एकूण पाच सामने खेळले गेले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सने तीन वेळा विजय मिळवला आहे, तर दिल्ली कॅपिटल्सने दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. जेव्हा जेव्हा दोन्ही संघ एकमेकांसमोर आले आहेत तेव्हा ते सामने रोमांचक झाले आहेत.

कुठे पाहणार तुम्ही सामना?

तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर गुजरात जायंट्स महिला आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला यांच्यातील सामना पाहू शकता. सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टार अ‍ॅपवर उपलब्ध असेल. (हे देखील वाचा: RCB W Beat GG W, 1st Match Scorecard: पहिल्या टी-20 सामन्यात आरसीबीने गुजरात जायंट्सचा 6 विकेट्सने केला पराभव, अॅलिस पेरी आणि रिचा घोषने खेळली स्फोटक खेळी)

दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स महिला क्रिकेट संघ: शफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), एलिस कॅप्सी, जेमिमा रॉड्रिग्ज, मॅरिझाने कॅप, नंदिनी कश्यप (विकेटकीपर), जेस जोनासेन, मिन्नू मणी, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, राधा यादव.

मुंबई इंडियन्स महिला क्रिकेट संघ: यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, एस सजना, नदीन डी क्लार्क, अमनजोत कौर, अक्षिता माहेश्वरी, एसबी कीर्तन, सईका इशाक.