Gujarat Giants Women vs Royal Challengers Bengaluru Women, WPL 2025 1st Match Scorecard Update:  महिला प्रीमियर लीगचा (Women's Premier League)  महाकुंभ आजपासून म्हणजेच 14 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. या लीगमध्ये चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. या लीगमध्ये पाच संघांनी भाग घेतला आहे. स्पर्धेतील पहिला सामना यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना वडोदऱ्यातील (Vadodara)  कोटाम्बी स्टेडियमवर  (Kotambi Stadium) खेळला जात आहे. दोन्ही संघांमध्ये अनेक नवीन बदल झाले आहेत, ज्यामुळे सामना अधिक रोमांचक होऊ शकतो. यावेळी गुजरात जायंट्सचे नेतृत्व अ‍ॅशले गार्डनर (Ashleigh Gardner) करत आहे. तर, आरसीबीची कमान स्मृती मानधनाच्या (Smriti Mandhana) खांद्यावर आहे. यावेळी WPL चार शहरांमध्ये आयोजित केले जात आहे.

दरम्यान, स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर, गुजरात जायंट्स प्रथम फलंदाजी करण्यासाठी आले आणि त्यांची सुरुवात शानदार झाली, दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी आक्रमक फलंदाजी केली आणि एकूण 35 धावा केल्या.

गुजरात जायंट्स संघाने निर्धारित 20 षटकांत पाच गडी गमावून 201 धावा केल्या. गुजरात जायंट्सकडून कर्णधार अ‍ॅशले गार्डनरने सर्वाधिक 79 धावांची नाबाद खेळी केली. या धमाकेदार खेळीदरम्यान, कर्णधार अ‍ॅशले गार्डनरने 37 चेंडूत तीन चौकार आणि आठ षटकार मारले. कर्णधार अ‍ॅशले गार्डनर व्यतिरिक्त बेथ मूनीने 54 धावा केल्या.

दुसरीकडे, स्टार वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूर सिंगने आरसीबी संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. आरसीबीकडून रेणुका ठाकूर सिंगने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. रेणुका ठाकूर सिंग व्यतिरिक्त जॉर्जिया वेअरहॅम, कनिका आहुजा आणि प्रेमा रावत यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी आरसीबी संघाला 20 षटकांत 202 धावा कराव्या लागल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना, आरसीबीची सुरुवात निराशाजनक झाली कारण दोन्ही सलामीवीर केवळ 14 धावा करून बाद झाले. आरसीबी संघाने 18.3 षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. आरसीबीकडून रिचा घोषने सर्वाधिक नाबाद 64 धावांची खेळी केली. या धमाकेदार खेळीदरम्यान, रिचा घोषने 27 चेंडूत सात चौकार आणि चार षटकार मारले. रिचा घोष व्यतिरिक्त, अॅलिस पेरीने 57 धावा केल्या.

त्याच वेळी, कर्णधार अ‍ॅशले गार्डनरने गुजरात जायंट्स संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. गुजरात जायंट्सकडून अ‍ॅशले गार्डनरने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. अ‍ॅशले गार्डनर व्यतिरिक्त, डिआंड्रा डॉटिन आणि सायली सातघरे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

पहिल्या डावातील धावफलक:

गुजरात जायंट्स फलंदाजी: 201/5, 20 षटकांत (लॉरा वोल्वार्ड 6 धावा, बेथ मुनी 54 धावा, दयालन हेमलता 4 धावा, अ‍ॅशले गार्डनर 79 धावा नाबाद, डिएंड्रा डॉटिन 25 धावा, हरलीन देओल 9 धावा नाबाद, सिमरन शेख 11 धावा.)

आरसीबी गोलंदाजी: (रेणुका ठाकूर सिंग 2 बळी, कनिका आहुजा 1 बळी, जॉर्जिया वेअरहॅम 1 बळी आणि प्रेमा रावत 1 बळी).

दुसऱ्या डावातील धावफलक:

आरसीबी फलंदाजी: 202/4, 18.3 षटकांत (स्मृती मानधना 9 धावा, डॅनिएल वायट-हॉज 4 धावा, एलिस पेरी 57 धावा, राघवी बिस्ट 25 धावा, रिचा घोष 64 धावा नाबाद, कनिका आहुजा 30 धावा नाबाद.)

गुजरात जायंट्स गोलंदाजी: (अ‍ॅशले गार्डनर 2 बळी, डिआंड्रा डॉटिन 1 बळी, सायली सातघरे 1 बळी)