
Today's Googly: रेकॉर्डच्याबाबतीत विचार केला तर बऱ्याचदा मोठ्या फलंदाजांची नावे येतात. यावेळी गोलंदाजांतून फलंदाज बनलेल्या जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) हा आर्श्चकारक विक्रम केला आहे. बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये असा विक्रम रचला आहे जो कोणत्याही फलंदाजाला मोडणे सोपे जाणार नाही. 2022 मध्ये बर्मिंगहॅम कसोटीदरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 35 धावा ठोकल्या(Jasprit Bumrah Test Record).
हे दृश्य क्रिकेटप्रेमींसाठी आश्चर्यकारक होते. कारण सहसा बुमराह त्याच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो, परंतु यावेळी त्याने चेंडू व्यतिरिक्त बॅटने इतिहास रचला.
35 धावा कशा केल्या गेल्या?
बुमराहने या षटकात 4 शानदार चौकार आणि 2 जबरदस्त षटकार मारले. याशिवाय एका वाईड बॉल आणि एका नो-बॉलमधूनही धावा काढल्या. या एका षटकात एकूण 35 धावा काढण्यात आल्या. बुमराहच्या या स्फोटक फलंदाजीने मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना तसेच संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले.
ब्रायन लाराचा विक्रम मोडला
यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू ब्रायन लाराच्या नावावर होता. लाराने 2003 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे एका षटकात 28 धावा केल्या होत्या. पण बुमराहने लाराचा हा 19 वर्षांचा विक्रम मोडला आणि एक नवा इतिहास रचला.
बुमराहची ही कामगिरी मोठी खास आहे कारण तो प्रामुख्याने गोलंदाज आहे. एकापेक्षा एक वरचढ फलंदाजांनी भरलेल्या या सामन्यात जेव्हा एखादा गोलंदाज असा विक्रम करतो तेव्हा ते खरोखरच कौतुकास्पद असते.
स्टुअर्ट ब्रॉडसाठी मोठा धक्का
बुमराहची ही कामगिरी स्टुअर्ट ब्रॉडसाठी दुसरा मोठा धक्का होता. यापूर्वी टी-20 क्रिकेटमध्ये युवराज सिंगने एका षटकात 6 षटकार मारून ब्रॉडला नमवले होते. त्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये बुमराहने ब्रॉडविरुद्ध इतिहास रचला आहे. जसप्रीत बुमराहने क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे हे दाखवून दिले आहे. एक गोलंदाजही बॅटने अशा अद्भुत गोष्टी करू शकतो की जग पाहत राहील. बुमराहचा हा पराक्रम भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला आहे.