Most Sixes In IPL By Team: आयपीएलच्या इतिहासात 'या' संघानी केला कहर, ठोकले सर्वाधिक षटकार; एका क्लिकवर पाहा आकडेवारी
रोहित शर्मा (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग 2024 ची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. 22 मार्चपासून आयपीएलचा 17वा हंगाम सुरू होत आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (CSK vs RCB) यांच्यात होणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. तर आरसीबी संघाला एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. अशा परिस्थितीत क्रिकेटच्या गल्लीबोळात फक्त आयपीएलचीच चर्चा होत आहे. चेन्नई सुपर किंग्ज गेल्या मोसमाचा विजेता आहे. अंतिम सामन्यात सीएसकेने गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. मात्र यावेळी गेल्या हंगामातील अंतिम फेरीतील संघांमध्ये पहिला सामना होत नाही. चाहत्यांना या स्पर्धेतील सर्व सामन्यांचा मोफत आनंद घेता येणार आहे. यासाठी चाहत्यांना फक्त इंटरनेट आणि स्मार्टफोनची आवश्यकता असेल. आयपीएलमध्ये चौकार आणि षटकारांची संख्या खूप आहे.

'या' संघांनी लगावले सर्वाधिक  षटकार

1. मुंबई इंडियन्स

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारा संघ 5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये आतापर्यंत 1548 षटकार मारले आहेत. मुंबई इंडियन्स 2008 पासून या स्पर्धेत सहभागी होत असून आतापर्यंत झालेल्या 247 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी एकूण 1548 षटकार ठोकले आहेत.

2. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या संघांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दुसऱ्या स्थानावर आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २४१ सामने खेळले आहेत. या कालावधीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 1484 षटकार ठोकले आहेत. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या संघांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दुसऱ्या स्थानावर आहे.

3. चेन्नई सुपर किंग्ज

या यादीत चेन्नई सुपर किंग्ज संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने 225 सामन्यांमध्ये एकूण 1401 षटकार ठोकले आहेत. एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्जला 5 वेळा चॅम्पियन बनवले आहे. (हे देखील वाचा: IPL 2024: आयपीएलमध्ये एमएस धोनी-रोहित शर्मा रचू शकता इतिहास, फक्त करावे लागेल 'हे' काम)

4. पंजाब किंग्ज 

पंजाब किंग्ज संघ देखील 2008 पासून आयपीएलचा भाग आहे. पंजाब किंग्सने आतापर्यंत खेळलेल्या 232 सामन्यांमध्ये 1393 षटकार मारले आहेत. पंजाब किंग्ज अजूनही त्यांच्या पहिल्या आयपीएल ट्रॉफीच्या शोधात आहेत. पंजाब किंग्जला अद्याप विजेतेपद मिळवता आलेले नाही.

5. कोलकाता नाईट रायडर्स 

या यादीत कोलकाता नाईट रायडर्स संघ पाचव्या स्थानावर आहे. आयपीएलच्या इतिहासात कोलकाता नाईट रायडर्सने 237 सामने खेळले आहेत. या कालावधीत कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी 1351 षटकार ठोकले आहेत. आत्तापर्यंत कोलकाता नाईट रायडर्सने 2 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत.