IND vs ENG 1st ODI Nagpur: 19 नोव्हेंबर 2023 विश्वचषकाचा अंतिम सामना. (World Cup Final 2023). या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) मागे धावत असताना रोहित शर्माचा (Rohit Sharma) एक शानदार झेल घेतला. तो झेल इतका अद्भुत होता की क्रिकेट चाहते आजही त्याचे कौतुक करतात. आज 6 फेब्रुवारी 2025 भारत आणि इंग्लंड यांच्यातील नागपूरमध्ये पहिला एकदिवसीय सामना (IND vs ENG) खेळवला जात आहे. या सामन्यात असाच आणखी एक झेल घेण्यात आला. पण यावेळी क्षेत्ररक्षक यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आहे. या सामन्याद्वारे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या यशस्वीने मैदानावर येताच आपली छाप सोडली. (हे देखील वाचा: Virat Kohli Injured: भारताला मोठा धक्का! नागपूरमध्ये विराट कोहलीला दुखापत; प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर)
Yashasvi Jaiswal took a catch similar to Rohit Sharma's catch taken by Travis Head in the 2023 World Cup final..!!!#INDvsENG #YashasviJaiswal #TravisHead #ENGvsIND pic.twitter.com/0uwZgxGJ2t
— Diptiman Yadav (@diptiman_6450) February 6, 2025
यशस्वी जयस्वालचा अद्भुत झेल
खरंतर, इंग्लंडच्या डावाच्या 10 व्या षटकात एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या हर्षित राणाने हार्ड-लेंथ चेंडू टाकला तेव्हा ही घटना घडली. चांगल्या लयीत दिसत असलेला बेन डकेट पुढे आला आणि त्याने पुल शॉट खेळला, पण चेंडू बॅटवर नीट लागला नाही आणि तो उंच हवेत उडला. मिडविकेटवर तैनात असलेल्या यशस्वी जयस्वालला चेंडूची दिशा कळली, तो वेगाने धावला आणि पूर्ण लांबीने डायव्ह करत एक अद्भुत झेल घेतला. त्याच्या शानदार क्षेत्ररक्षणामुळे भारताला दुसरा बळी मिळाला आणि डकेट 32 चेंडूत 29 धावा काढून बाद झाला.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): बेन डकेट, फिलिप साल्ट (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद