Team India (Photo Credit - Twitter)

महिला टी-20 विश्वचषक 2023 मधील (Women's T20 World Cup) गट टप्प्यातील सामने संपले आहेत. या कालावधीत दोन गटात विभागलेल्या 10 संघांमध्ये एकूण 20 सामने खेळवण्यात आले. येथे प्रत्येक संघाचे एकूण 4-4 सामने आले. टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत चार संघ पात्र ठरले आहेत, ज्यात टीम इंडिया (Team India), ऑस्ट्रेलिया (AUS), दक्षिण आफ्रिका (SA) आणि इंग्लंड (ENG) यांचा समावेश आहे. टीम इंडियाने महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. टीम इंडिया आता उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. उपांत्य फेरीत दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना होऊ शकतो.

दुसरा उपांत्य सामना 24 फेब्रुवारी रोजी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. पहिला उपांत्य सामना 23 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे खेळवला जाईल. दुसरा उपांत्य सामना 24 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात केपटाऊनमध्ये खेळवला जाईल. (हे देखील वाचा: Women's T20 WC 2023 Semifinal: पाकिस्तानच्या पराभवामुळे भारताचा अंतिम फेरीतील मार्ग कठीण, इथे संपूर्ण समीकरण घ्या समजून)

हे पहा विशेष आकडे 

सर्वात मोठी धावसंख्या: इंग्लंड संघाने पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट गमावून 213 धावांची मोठी धावसंख्या उभारली.

सर्वात मोठा विजय: इंग्लंडचा पाकिस्तानवर 114 धावांनी विजय हा धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय होता. त्याचवेळी, विकेट्सच्या बाबतीत, ऑस्ट्रेलियाने 25 चेंडू शिल्लक असताना श्रीलंकेचा 10 विकेट्सने पराभव केला.

सर्वाधिक धावा: या विश्वचषकात इंग्लंडची महान अष्टपैलू खेळाडू नेट सिव्हर धावा करण्यात आघाडीवर आहे. तिने 4 सामन्यात 88 च्या सरासरीने 176 धावा केल्या आहेत.

सर्वोत्तम खेळी: पाकिस्तानच्या मुनीबा अलीने आयर्लंडविरुद्ध 68 चेंडूत 102 धावा केल्या. या विश्वचषकात शतक झळकावणारी मुनिबा ही एकमेव खेळाडू आहे.

सर्वात मोठी भागीदारी: दक्षिण आफ्रिकेच्या वोल्वार्ड आणि ब्रिटिस यांनी बांगलादेशविरुद्ध 117 धावांची भागीदारी केली.

सर्वाधिक षटकार: टीम इंडियाची फलंदाज स्मृती मानधना या विश्वचषकात चार षटकारांसह अव्वल स्थानावर आहे.

सर्वाधिक फलंदाजी सरासरी: टीम इंडियाची रिचा घोष 122 च्या सरासरीने धावा करत आहे. 4 डावांमध्ये ऋचा घोषने तीन वेळा नाबाद राहताना एकूण 122 धावा केल्या आहेत.

सर्वाधिक बळी: इंग्लंडची अनुभवी गोलंदाज सोफी एकेलस्टरने 4 सामन्यात 61 धावांत 8 बळी घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मेगन शट आणि न्यूझीलंडच्या ली ताहुहू यांनीही 8-8 विकेट घेतल्या आहेत.

सर्वोत्तम गोलंदाजी खेळी: ऑस्ट्रेलियाच्या ऍशले गार्डनरने या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध तीन षटकात केवळ 12 धावा देऊन 5 बळी घेतले.

सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक: टीम इंडियाच्या रिचा घोषने आतापर्यंत विकेटच्या मागे 6 शिकार केल्या आहेत. यात स्टंपिंगचाही समावेश आहे.