AFG vs ZIM (Photo Credit - X)

Zimbabwe National Cricket Team vs Afghanistan National Cricket Team, 2nd ODI Match 2024 Live Streaming: झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (ZIM vs AFG यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज 21 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब (Harare Sports Club) येथे भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजता खेळवला जाईल. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तान संघाने झिम्बाब्वेचा 232 धावांनी पराभव केला. तर पहिला सामना पावसामुळे वाहून गेला. यासह अफगाणिस्तान संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत झिम्बाब्वेची कमान क्रेग एर्विनच्या हाती आहे. तर अफगाणिस्तानचे नेतृत्व हशमतुल्ला शाहिदी करत आहे.

झिम्बाब्वे -अफगाणिस्तान हेड टू हेड रेकॉर्ड (ZIM vs AFG Head to Head)

झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान संघांमध्ये आतापर्यंत एकूण 30 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या काळात अफगाणिस्तानचा वरचष्मा दिसतो. अफगाणिस्तानने 19 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. तर झिम्बाब्वेने केवळ 10 सामने जिंकले आहेत. तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. अफगाणिस्तानचा संघ अधिक मजबूत आहे. मात्र, घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा झिम्बाब्वेला मिळू शकतो.

झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना कधी अन् कुठे खेळला जाईल?

झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 1:00 वाजता खेळवला जाईल. तर नाणेफेकीची वेळ या आधी अर्धा तास असेल. (हे देखील वाचा: Rashid Khan Captain: राशिद खान झाला कर्णधार, जाणून घ्या IPL 2025 पूर्वी कोणी सोपवली जबाबदारी?)

झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना कुठे पाहणार?

आम्ही तुम्हाला सांगूया की सध्या भारतातील टीव्ही चॅनेलवर झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेच्या प्रसारणाविषयी कोणतीही माहिती नाही. तथापि, एकदिवसीय मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर भारतात उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना येथून दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचा आनंद लुटता येईल.

दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11

झिम्बाब्वे: तादिवानाशे मारुमनी (विकेटकीपर), बेन कुरन, डीओन मायर्स, क्रेग एर्विन (कर्णधार), शॉन विल्यम्स, सिकंदर रझा, ब्रायन बेनेट, न्यूमन न्यामाहुरी, रिचर्ड एनग्रावा, ब्लेसिंग मुझाराबानी, ट्रेव्हर ग्वांडू.

अफगाणिस्तान: सिदीकुल्लाह अटल, अब्दुल मलिक, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), राशिद खान, एएम गझनफर, फजलहक फारुकी, नावेद झदरान.