आशिया कप 2023 चा (Asia Cup 2023) शेवटचा सुपर फोर सामना शुक्रवारी टीम इंडिया आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात बांगलादेश संघाने टीम इंडियाचा 6 धावांनी पराभव केला आहे. मात्र, बांगलादेशचा संघ आधीच या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. यासोबतच टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली आहे. आता रविवारी अंतिम फेरीत टीम इंडियाचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. आशिया कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. सुपर फोरच्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा पराभव केला होता. प्रत्येकजण या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहे. उभय संघांमधील हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. (हे देखील वाचा: Shubman Gill New Record: युवा सलामीवीर शुभमन गिलने केला अनोखा विक्रम, विराट कोहलीला मागे टाकले)
सर्वांच्या नजरा या दिग्गज खेळाडूंवर असतील
विराट कोहली : आशिया चषक स्पर्धेत विराट कोहलीची आतापर्यंतची कामगिरी दमदार राहिली आहे. विराट कोहली मोठ्या टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
रोहित शर्मा : 2018 साली टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आशिया कप जिंकला होता. यावेळीही रोहित शर्मा बॅटने चांगली कामगिरी करून अशीच काहीशी कामगिरी करण्याकडे लक्ष असणार आहे. रोहित शर्मा आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
शुभमन गिल : टीम इंडियाचा स्टार ओपनिंग बॅट्समन शुभमन गिलच्या बॅटला यंदा आग लागली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शुभमन गिल अवघ्या 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पण त्यानंतर त्याची बॅट जबरदस्त चालली आहे तसते बांगलादेशविरुद्ध शतकही झळकावले आहे. 2023 मध्ये शुभमन गिलने आतापर्यंत 12 सामन्यात 68.18 च्या सरासरीने 750 धावा केल्या आहेत. या काळात शुभमन गिलने 3 शतकी खेळीही खेळली आहे. अशा परिस्थितीत शुभमन गिलची आशिया चषक स्पर्धेतील कामगिरी संघासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
कुलदीप यादव : आशिया चषकासाठी मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादवचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. पुनरागमन झाल्यापासून कुलदीप यादवने चेंडूसह उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे. या वर्षी कुलदीप यादवने 11 सामन्यांत 17.18 च्या सरासरीने 22 विकेट घेतल्या आहेत.
जसप्रीत बुमराह: जवळपास वर्षभरानंतर टीम इंडियात पुनरागमन करणारा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची आशिया चषक स्पर्धेत खरी तंदुरुस्ती चाचणी होणार आहे. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराहकडे विश्वचषकापूर्वी स्वत:ला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी आहे. ही देखील टीम इंडियासाठी खूप चांगली गोष्ट आहे. जसप्रीत बुमराह हा सामना जिंकणारा गोलंदाज आहे. जसप्रीत बुमराहच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
आत्तापर्यंत आर प्रेमदासा स्टेडियमवर एकूण 158 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी 86 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी 62 सामने जिंकले आहेत. आर प्रेमदासा स्टेडियमवर पहिल्या डावाची सरासरी 232 धावा आणि दुसऱ्या डावाची 191 धावांची आहे.