Year Ender 2023 भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी 2023 हे वर्ष अविस्मरणीय ठरले. काही दिवसच राहिले आहे हे वर्ष संपायला. टीम इंडियाला (Team India) यंदा आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नसली तरी क्रिकेट विश्वात त्याचा दबदबा दिसून आला. या वर्षी टीम इंडियाने तिन्ही फॉरमॅटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 बनला. सन 2023 मध्ये भारतीय फलंदाजांनीही अशी कामगिरी केली जी याआधी इतर कोणताही संघ करू शकला नाही. यावर्षी एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळला गेला. अशा स्थितीत सर्व संघांचे लक्ष एकदिवसीय क्रिकेटवर होते. पण टीम इंडियाने वनडे सोबतच टी-20 मध्येही आपली शान कायम ठेवली. या वर्षी सूर्यकुमार यादव, शुभमल गिल, यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या भारतीय फलंदाजांनी टी-20 मध्ये शतके झळकावली. क्रिकेटच्या इतिहासात एकाच वर्षी एकाच संघातील 4 फलंदाजांनी टी-20 फॉर्मेटमध्ये शतके ठोकण्याची ही पहिलीच वेळ होती. याआधी कोणत्याही संघाला हा पराक्रम करता आलेला नाही.
श्रीलंकेने सूर्याच्या बॅट तापवली
2023 च्या सुरुवातीला भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली गेली. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने शतक झळकावले. सूर्याने अवघ्या 45 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याचवेळी सूर्यकुमार यादवने 51 चेंडूत नाबाद 112 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 9 षटकार मारले. (हे देखील वाचा: MS Dhoni Attends Fan's Birthday Party: चाहत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एमएस धोनी पोहोचला थेट त्याच्या घरी, केक कापतानाच्या व्हिडिओ व्हायरल)
शुभमल गिलच्या बॅटमधून ऐतिहासिक खेळी
टीम इंडियाने जानेवारी-फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकाही खेळली होती. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात शुभमन गिलने शतक झळकावले होते. अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात गिलने नाबाद 126 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने 63 चेंडूंचा सामना करत 12 चौकार आणि 7 षटकार मारले. या खेळीसह तो न्यूझीलंडविरुद्ध टी-20 डावात सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही ठरला.
आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक झळकावणारा यशस्वी पहिला भारतीय ठरला
आशियाई खेळ 2023 मध्ये भारत आणि नेपाळ क्रिकेट संघांमध्ये उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळला गेला. या सामन्यात यशस्वी जैस्वालने शतकी खेळी खेळली. त्याने 49 चेंडूत 100 धावा केल्या होत्या. जैस्वालचे टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील हे पहिले शतक होते. यासह तो टी-20 मध्ये भारताचा सर्वात तरुण शतकवीर ठरला. वयाच्या 21 दिवस 279 दिवसात त्याने नेपाळविरुद्ध शतक झळकावले.
ऋतुराज गायकवाड हा वर्षाचा चौथा शतकवीर ठरला
2023 मध्ये टीम इंडियासाठी चौथे टी-20 शतक ऋतुराज गायकवाडच्या बॅटने झळकावले. ऋतुराज गायकवाडने नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत शतक झळकावले. त्याने 57 चेंडूत नाबाद 123 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने 13 चौकार आणि 7 षटकार मारले.