चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार एमएस धोनी हा क्रीडा जगतातील सर्वात मोठा आयकॉन तर आहेच, पण तो एक डाउन-टू-अर्थ व्यक्ती देखील मानला जातो. महान भारतीय कर्णधाराने अलीकडेच चाहत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट त्याच्या घरी पोहचला. इंस्टाग्रामवर समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये धोनी बर्थडे बॉयच्या मागे उभा राहून वाढदिवसाचे गाणे गाताना दिसत आहे. यानंतर फॅनने धोनीला आधी केक खाऊ घालण्यासाठी पुढे बोलावले, पण धोनीने त्याला आधी त्याच्या एका मित्राला केक खायला सांगितला. मग धोनीही केक खातो आणि मग पाठीमागून बर्थडे बॉयचा हात धरतो आणि त्याच्या मित्राला तो केक चेहऱ्यावर लावायला सांगतो. (हे देखील वाचा: IND vs SA Test Series 2023: रोहित शर्मा कसोटी मालिकेसाठी सज्ज, कर्णधार तयारीत व्यस्त)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)