NZ vs AUS 1st T20I Live Streaming: ऑस्ट्रेलियन संघ न्यूझीलंडला पोहोचला आहे. 21 फेब्रुवारीपासून म्हणजे आजपासून दोन्ही संघांमधील तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत मिचेल मार्श ऑस्ट्रेलियन संघाची कमान सांभाळणार आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा संघ मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. (हे देखील वाचा: WPL 2024 च्या उद्घाटन सोहळ्याला लागणार बॉलिवूडचा तडका, Karthik Aaryan, Siddharth Malhotra आणि Tiger Shroff प्रेक्षकांना भुरळ घालणार)
कधी आणि कुठे पाहणार लाइव्ह
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टन येथे होणार आहे. तर दुसरा आणि तिसरा सामना ऑकलंडच्या ईडन पार्क स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 11.40 वाजता होणार आहे. दुसरीकडे, तिसरा सामना पहाटे 05.30 वाजता सुरू होईल. भारतातील Amazon Prime वर या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल. मात्र, भारतात टीव्हीवर या सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार नाही.
the clash begins!🏏
Watch #NZvsAUS 1st T20I today at 11:40 AM, LIVE and exclusive only on Prime Video!#CricketOnPrime pic.twitter.com/YkWXsONOJs
— prime video IN (@PrimeVideoIN) February 21, 2024
न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया हेड टू हेड रेकॉर्ड
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत झालेल्या 16 टी-20 सामन्यांपैकी न्यूझीलंडने 6 सामने तर ऑस्ट्रेलियाने 10 सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, न्यूझीलंडच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या 10 टी-20 पैकी ऑस्ट्रेलियाने 6 सामने जिंकले तर न्यूझीलंडने 4 सामने जिंकले.
टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ:
मिचेल मार्श (कर्णधार), पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मॅथ्यू वेड, स्पेन्सर जॉन्सन, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झाम्पा.
टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ:
मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन, ट्रेंट बोल्ट (दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी), मार्क चॅपमन, जोश क्लार्कसन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), लॉकी फर्ग्युसन, ॲडम मिल्ने, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, बेन सियर्स, इश सोधी, टिम साऊदी (पहिल्या सामन्यासाठी) आणि विल यंग.