WPL 2024 Opening Ceremony: महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्राचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. डब्ल्यूपीएल 2024-23 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. जिथे पहिला सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या मैदानावर होणार आहे. जिथे सलामीची लढत गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी, बंगळुरूमध्ये उद्घाटन समारंभ आयोजित केला जाईल, ज्यामध्ये बॉलिवूड स्टार्स त्यांच्या कामगिरीने प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसतील. वास्तविक, डब्ल्यूपीएल 2024 च्या उद्घाटन समारंभात, दोन बॉलिवूड स्टार सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) कार्तिक आर्यन (Karthik Aryan) आणि टायगर श्राॅफ (Tiger Shroff) उद्घाटन सोहळ्याची उत्कंठा वाढवतील. डब्ल्यूपीएलच्या सोशल मीडिया हँडलवर ही माहिती देण्यात आली आहे. उद्घाटन सोहळा सायंकाळी साडेसहा वाजता सुरू होईल.
Yeh Kingdom nahin, Ab Queendom Hai!
Join @iTIGERSHROFF as he fights for the Crown for his Queendom! 🤩
Watch #TATAWPL 2024 Opening Ceremony on @JioCinema & @Sports18 LIVE from the M. Chinnaswamy Stadium, Bengaluru.
🗓️ 23rd Feb
⏰ 6.30 pm
🎟️ https://t.co/jP2vYAVWv8 pic.twitter.com/DGbrS7goYD
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 20, 2024
Yeh Kingdom nahin, Ab Queendom Hai! @SidMalhotra joins the Crown for his Queendom 🤩
Watch #TATAWPL 2024 Opening Ceremony on @JioCinema & @Sports18 LIVE from the M. Chinnaswamy Stadium, Bengaluru.
🗓️ 23rd Feb
⏰ 6.30 pm
🎟️ https://t.co/jP2vYAVWv8 pic.twitter.com/GTiTkELN7G
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 20, 2024
Yeh Kingdom nahin, Ab Queendom Hai!
Join @TheAaryanKartik as he fights for the Crown for his Queendom!
Watch the #TATAWPL 2024 Opening Ceremony on @JioCinema & @Sports18 LIVE from the M. Chinnaswamy Stadium, Bengaluru.
🗓️ 23rd Feb
⏰ 6.30 PM
🎟️ https://t.co/jP2vYAWukG pic.twitter.com/p5tVvkWcMp
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 19, 2024
डब्ल्यूपीएल टी-20 च्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली याबद्दल सगळी माहिती देण्यात आली आहे. तसेच, टाटा डब्ल्यूपीएल 2024 चा उद्घाटन सोहळा जियो सिनेमा आणि स्पोर्टस 18 च्या अधिकृत साइटवर पाहता येईल. (हे देखील वाचा: IND vs ENG 4th Test: चोथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पूर्णपणे बदलणार, बुमराह आणि राहुल रांची कसोटीतून बाहेर)
डब्ल्यूपीएल 2023 च्या उद्घाटन समारंभात, अभिनेत्री क्रिती सेनन आणि कियारा अडवाणी यांनी आपल्या नृत्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, तर गायक एपी ढिल्लनने आपल्या गाण्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्याच वेळी, यावेळी डब्ल्यूपीएल 2024 चे सामने बेंगळुरू आणि मुंबईत खेळवले जातील. स्पर्धेचा सलामीचा सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 17 मार्च रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे.