India Vs England 2021: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात; दुखापतग्रस्त रविंद्र जाडेजा याच्या जागी 'या' खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता
भारतीय क्रिकेट संघ (Photo Credit: AP/PTI Image)

ऑस्ट्रेलिया दौरा आटोपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरोधात (IND Vs ENG) खेळणार आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेपासून होणार आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया दौरा भारतीय खेळांडूसाठी काही चांगला गेला नाही. या दौऱ्यावर भारताचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. याचदरम्यान, भारताचा महत्वाचा खेळाडून रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja) हा देखील दुखापतग्रस्त झाला आहे. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला किमान 5-6 आठवडे लागू शकतात. यामुळे येत्या 5 फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत जाडेजाचच्या जागी कोण खेळणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच रविंद्र जाडेजा याच्या जागी भारताचा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

कुलदीप यादवने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही त्याची निवड करण्यात आली होती. मात्र, आर अश्विन आणि रविंद्र जाडेच्या यांनी कसोटी मालिकेत चांगली कामगिरी बजावली. यामुळे कुलदीप यादवला संघात जागा मिळाली नाही. कुलदीप यादवने भारतीय संघासाठी एकूण 6 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांत त्याने 24.1 च्या सरासरीने 24 विकेट्स घेतले आहेत. तर, त्याचा इकोनॉमी रेट 3.51 इतका आहे. कुलदीप यादवने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वोकृष्ट कामगिरी करत सर्वांनाच प्रेरित केले आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 31 डावात 121 विकेट्स घेतले आहेत. हे देखील वाचा-Sorry to Indian Team: सिडनीत घडलेल्या 'त्या' प्रकारानंतर डेव्हिड वार्नर याने मागितली मोहम्मद सिराज आणि भारतीय संघाची माफी

इंग्लंडचा संघ लवकरच भारतात दाखल होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ इंग्लंडसोबत 4 कसोटी, 5 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात कसोटी सामन्यांपासून होणार आहे. त्यानंतर टी-20 आणि अखेर एकदिवसीय मालिका खेळण्यात येणार आहे.