ऑस्ट्रेलिया आणि भारत (Australia Vs India) यांच्यात सिडनी मैदानावर (Sydney Cricket Stadium) खेळण्यात आलेला तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राहिला. मात्र, या सामन्यात भारताचे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि जसप्रीस बुमराह (Jasprit Bumrah) यांना वर्णद्वेषीचा सामना करावा लागला आहे. सामना सुरु असताना मैदानातील प्रेक्षकांनी त्यांच्याविषयी वर्णद्वेषी टिपण्णी केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरावर संपूर्ण किक्रेट विश्वातून नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकारावर ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज डेव्हिड वार्नरने (David Warner) इंस्टाग्रामच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच मोहम्मद सिराज यांच्यासह संपूर्ण भारतीय संघाची माफीदेखील मागितली आहे.
सिडनी कसोटी दरम्यान प्रेक्षकांनी दोनदा भारतीय खेळाडूंविरूद्ध वर्णद्वेष भाष्य केले. काही प्रेक्षकांनी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्याविरूद्ध आक्षेपार्ह शब्द उच्चारले. ही घटना शनिवारी घडली. मात्र, रविवारी पुन्हा एकदा मोहम्मद सिराजविरोधात वर्णद्वेषी टीका करण्यात आली. तथापि, त्याचवेळी त्या प्रेक्षकांना मैदानातून हकलण्यात आले होते. या घटनेचे संपूर्ण जगभर पडसाद उमटले आहेत. यासंदर्भात डेव्हिड वार्नरने आपले मत मांडले आहे. "कोणत्याही वातावरणात आणि कोणत्याही वेळी वर्णद्वेष आणि अपशब्दांचा स्वीकार केला जाणार नाही. सिडनीमध्ये मोहम्मद सिराज याच्यासोबत जे घडले, त्याबद्दल मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. गाबा येथे खेळल्या जाणाऱ्या चौथ्या सामन्यात प्रेक्षक चांगल्याप्रकारे वागतील, अशी आशा आहे, अशा पोस्ट त्याने इंस्टाग्रामवर केली आहे. हे देखील वाचा- Brisbane Test: भारतीय संघाला मोठा झटका, जसप्रित बुमराह आजाराच्या कारणास्तव बाहेर
डेव्हिड वार्नर इंस्टाग्राम पोस्ट-
View this post on Instagram
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या चार सामन्याच्या मालिकेत दोन्ही संघाने 1-1 अशी बरोबरी केली आहे. तर, तिसरा सामना अनिर्णीत राहिला आहे. यामुळे ब्रिस्बेन येथे खेळण्यात येणार अखेरचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा ठरणार आहे. येत्या 15 जानेवारीपासून या सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकून मालिका विजय मिळवण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत.