Brisbane Test: भारतीय संघाला मोठा झटका, जसप्रित बुमराह आजाराच्या कारणास्तव बाहेर
जसप्रीत बुमराह (Photo Credits: Getty Images)

Brisbane Test:  दुखापतींसोबत संघर्ष करणाऱ्या भारतीय संघाला मंगळारी आणखी एक झटका बसला आहे. कारण आता वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह (Jasprit Bumrah) याला पोटात खेचल्यासारखे वाटत असल्याने ऑस्ट्रेलियाच्या विरोधात होणाऱ्या चौथ्या टेस्ट सामन्यातून बाहेर पडला आहे. तर बुमराह याला हा त्रास सिडनी मध्ये झालेल्या ड्रॉ झालेल्या तिसऱ्या टेस्ट मॅच दरम्यान जाणवू लागला होता.(IND vs AUS: भारताला अजून एक धक्का; दुखापतीमुळे अखेरच्या कसोटी मधून Hanuma Vihari बाहेर, इंग्लंडविरुद्धही मालिका खेळणे कठीण)

प्राप्त झालेल्या माहितीनुसार बुमहार याच्या स्कॅनिंगच्या रिपोर्टमध्ये त्याच्या पोटात खेचल्यासारखे होत असल्याचे दिसून आले आहे. भारतीय संघाचे प्रबंधकांना इंग्लंडच्या विरोधात खेळवल्या जाणारा आगामी चार टेस्ट सामन्यात त्याची दुखापत अधिक वाढवण्याची जोखिम घेऊ शकत नाही. बीसीसीआयच्या सुत्रांनी PTI यांना असे सांगितले की, सिडनी मध्ये फिल्डिंग करताना बुमराह याला पोटात खेचल्यासारखे जाणवू लागले होते.(IND vs AUS 3rd Test 2021: रिषभ पंतने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई करत नावावर केले दोन ‘मोठे’ विक्रम; चेतेश्वर पुजारा पार केली ‘सहा हजारी’)

Tweet:

तर ब्रिसबेन टेस्ट मधून बाहेर राहणार असला तरीही तो इंग्लंडच्या विरोधातील खेळवण्यात येणाऱ्या सामन्यात दिसेल अशी अपेक्षा केली जात आहे. त्याचसोबत दोन कसोटी सामने खेळलेला मोहम्मद सिराज हा सामान्यात आपली पुन्हा एकदा दमदार खेळी 15 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ब्रिस्बेन कसोटीत दाखवेल. त्याला नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर आणि टी नटराजन त्याला साथ देतील.