IPL 2024 (Photo Credit - Twitter)

Loksabha Elections Date Announced: आयपीएल 2024 च्या (IPL 2024) पहिल्या टप्प्याचे फक्त वेळापत्रक जाहीर करण्यात आले. यानंतर लोकसभा निवडणुकीमुळे दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक ठरले नाही. शनिवारी सकाळी टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानंतर, आयपीएलचा दुसरा टप्पा यूएईमध्ये (UAE) होऊ शकतो अशी चर्चा होती. दरम्यान, दुपारी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर मोठे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सर्वात मोठा प्रश्न होता की आयपीएलचा दुसरा टप्पा भारतात होणार नाही का? भारतात 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आयपीएलचा दुसरा टप्पाही होणार आहे.

मात्र, आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ हे आयपीएल भारतातच आयोजित करणार असल्याचे वारंवार सांगत आहेत. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याचे ठिकाण आणि निवडणुकांच्या तारखांनंतरच निर्णय घेतला जाईल, असे ते सांगत होते. पण लोकसभा निवडणूक ही मोठी घटना आहे, अशा परिस्थितीत आयपीएलचे वेळापत्रक त्यानुसार व्यवस्थापित करणे बीसीसीआयसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. (हे देखील वाचा: IPL 2024: आयपीएलपूर्वी कॉमेंट्री पॅनल जाहीर, हरभजन सिंग-सुनील गावस्कर यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे यादीत समाविष्ट)

पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक

पण फायद्याचा विचार केला तर आयपीएल भारतात झाले नाही तर मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. आयपीएलचा दुसरा टप्पा भारतातच होणार असल्याची माहिती अजूनही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये येत आहे. पहिल्या टप्प्यात 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान आयपीएलचे सामने खेळवले जातील. आता चाहते पुढील वेळापत्रकाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

1 जूनपासून विश्वचषक स्पर्धेला होणार सुरुवात

आयपीएल 2024 नंतर टी-20 विश्ववचषक 2024 1 जूनपासून भारतात होणार आहे. भारतात फक्त 1 जूनपर्यंत निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकांच्या दरम्यान कदाचित आयपीएल भारतात होणार नसल्याचे बोलले जात आहे. पण जिथे निवडणुका होत नाहीत तिथे सामने होऊ शकतील असे वेळापत्रक मंडळ करते का हे पाहायचे आहे. कारण भारतात आयपीएलदरम्यान होणारा प्रेक्षक पाठिंबा किंवा प्रमोशन परदेशात होऊ शकत नाही. विश्वचषकापूर्वी ते पूर्ण करणे देखील आवश्यक आहे, अशा परिस्थितीत यावर काय तोडगा निघतो हे पाहावे लागेल.