IND vs PAK (Photo Credit - Twitter)

महिला टी-20 विश्वचषक 2023 सुरु (Women's T20 World Cup 2023) झाला आहे. दुसरीकडे, भारतीय संघ या स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात आज केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे पाकिस्तानविरुद्धच्या (IND vs PAK) सामन्यातून करणार आहे. दोन्ही संघांना एकाच गटात ठेवण्यात आले आहे. या सामन्यात दोघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तानचे संघ ब गटात आहेत. या गटात इंग्लंड, आयर्लंड आणि वेस्ट इंडिजचे संघही आहेत. पाच संघांच्या या गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करतील. तसेच गट-अ मध्ये 5 संघ असून, त्यापैकी दोन संघांना उपांत्य फेरीचे तिकीट मिळणार आहे.

कुठे पाहणार सामना?

टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात आज केपटाऊनच्या न्यूलँड्स क्रिकेट स्टेडियमवर सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर केले जाणार आहे. डिस्ने + हॉटस्टार अॅपवरही सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. (हे देखील वाचा: IND W vs PAK W T20 WC 2023: भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार आज हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' महान खेळाडूंवर)

हेड टू हेड आकडेवारी

भारतीय महिला संघ आणि पाकिस्तान महिला संघ यांच्यात आतापर्यंत 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने 10 मध्ये तर पाकिस्तानने 3 मध्ये विजय मिळवला आहे. दोन्ही संघांमधील मागील पाच सामन्यांमध्ये टीम इंडियाने सलग विजयांची नोंद केली आहे. भारतीय महिला संघ आणि पाकिस्तान महिला संघ यांच्यातील शेवटचा टी-20 सामना गेल्या वर्षी जुलैमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यान झाला होता. 31 जुलै रोजी एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला.

टीम इंडियाचे वेळापत्रक:

टीम इंडियाचा पहिला सामना आज पाकिस्तानसोबत होणार आहे. दुसरा सामना 15 फेब्रुवारीला वेस्ट इंडिजसोबत होणार आहे. लीगमधील तिसरा सामना 18 फेब्रुवारीला इंग्लंडसोबत होणार आहे. त्याच वेळी, चौथा सामना 20 फेब्रुवारीला आयर्लंडशी होईल. भारतीय महिला संघाला एकदाही विश्वचषकाचे विजेतेपद पटकावता आलेले नाही, अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या या स्पर्धेतून यावेळी टीम इंडियाकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

12 फेब्रुवारी - टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान - संध्याकाळी 6:30 वा

15 फेब्रुवारी - टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज - संध्याकाळी 6:30 वा

18 फेब्रुवारी - टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड - संध्याकाळी 6:30 वा

20 फेब्रुवारी - टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड - संध्याकाळी 6:30 वा

टीम इंडिया आणि पाकिस्तानचा संघ

टीम इंडिया: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), रिचा घोष (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवाणी, पूजा वस्त्राकार, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे.

राखीव: सबिनेनी मेघना, स्नेह राणा, मेघना सिंग.

पाकिस्तान: बिस्माह मारूफ (कर्णधार), आयमेन अन्वर, आलिया रियाझ, आयेशा नसीम, ​​सदफ शमास, फातिमा सना, जवेरिया खान, मुनीबा अली, नशरा संधू, निदा दार, ओमिमा सोहेल, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सिद्रा नवाज, तुबा हसन.

राखीव: गुलाम फातिमा, कैनात इम्तियाज.