Team India (Photo Credit - Twitter)

आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मधील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघाकडे (Team India) टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या (T20 World Cup 2022) तयारीसाठी फक्त काही सामने शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत बीसीसीआयने (BCCI) आगामी टी-20 विश्वचषक 2022, मायदेशी खेळवण्यात येणाऱ्या ऑस्ट्रेलिया (AUS) आणि दक्षिण आफ्रिका (SA) टी-20 सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघात धक्कादायक बदल झाले नसले तरी 15 सदस्यीय मुख्य संघ आणि चार स्टँडबाय खेळाडूं निवडले आहे. टीम इंडियासाठी चांगली बातमी म्हणजे जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल (Jasprit Bumrah and Harshal Patel) संघात परतले आहेत. दरम्यान, या सगळ्या मध्ये टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाज आवेश खानला (Avesh Khan) संघातून वगळण्यात आले आहे.

T20 विश्वचषत स्पर्धेतुन आवेश खान बाहेर

आशिया कपमध्ये टीम इंडियाला सगळ्यात महाग खेळाडू ठरला तो म्हणजे वेगवान गोलंदाज आवेश खान. या खेळाडूची कामगिरी इतकी खराब झाली आहे की आता या खेळाडूला आगामी टी-20 विश्वचषकातुन बाहेर ठेवण्यात आले आहे. आवेश खानला आशिया चषकात केवळ 2 विकेट घेता आल्या होत्या आणि तो खूप महागातही ठरला होता.

आवेश खानच्या कामगिरीत लक्षणीय घसरण

आवेश खान वेस्ट इंडिज दौऱ्यापासून खराब फॉर्ममध्ये असून हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात त्याने 50 हून अधिक धावा दिल्या. आवेश खानच्या कामगिरीत लक्षणीय घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत आवेश खान कधीही टीम इंडियाकडून खेळताना दिसेल की नाही अशी शंका वर्तवली जात आहे. (हे देखील वाचा: Team India Squad: बुमराह आणि हर्षल पटेलच्या पुनरागमनासह T20 विश्वचषक स्पर्धेतील टीम इंडियाच्या संघ निवडीबद्दल जाणून घ्या मोठ्या गोष्टी)

T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.

राखीव खेळाडू

मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर