IND vs SA: टीम इंडिया 2024 मधील (Team India) पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) खेळणार आहे. दोन्ही संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना केपटाऊन (Cape Town) येथील न्यूलँड्स मैदानावर होणार आहे. टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना गमावला आहे, त्यामुळे मालिका गमावणे टाळायचे असेल तर केपटाऊन कसोटी (Cape Town Test) कोणत्याही किंमतीत जिंकावी लागेल. (हे देखील वाचा: Year Ender 2023: यंदा क्रिकेटविश्वात घडले अनोखे पराक्रम, यादीत विराट कोहलीचाही समावेश; रेकॉर्ड्सवर एक नजर)
केपटाऊनमध्ये टीम इंडियाची जोरदार तयारी
केपटाऊन कसोटीसाठी टीम इंडियाने जोरदार तयारी सुरू केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर संघाला दोन दिवसांची विश्रांती देण्यात आली होती, मात्र आता पुन्हा तयारी सुरू केली आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या सराव सत्राचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये भारतीय खेळाडूंनी सराव सत्रात चांगलाच घाम गाळल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
कसा आहे केपटाऊनचा रेकॉर्ड ?
या मैदानावर आतापर्यंत 59 कसोटी सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 48 सामन्यांचे निकाल जाहीर झाले असून 11 सामने अनिर्णित राहिले आहेत. त्याचबरोबर या मैदानावर टीम इंडियाने आतापर्यंत 6 कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी भारतीय संघाला 4 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याच वेळी, 2 सामने अनिर्णित राहिले. अशा स्थितीत टीम इंडियाला यावेळी विजयासाठी हे आकडे बदलावे लागतील.
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध कृष्णा, केएस भरत (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, आवेश खान
दुसऱ्या कसोटीसाठी दक्षिण आफ्रिका संघ:
डेव्हिड बेडिंगहॅम, नांद्रे बर्जर, एडन मार्कराम, विआन मुल्डर, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन, टोनी डी जोर्जी, डीन एल्गर (कर्णधार), मार्को जॅन्सन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कीगन पीटरसन.