Rishabh Pant Car Accident: टीम इंडियाचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) गाडीला अपघात झाला आहे. ऋषभ पंत दिल्लीहून रुरकीला जात होता. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. ऋषभ पंतच्या अपघाताचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. आता अपघाताचे मुख्य कारण समोर आले आहे. तो स्वतः कार चालवत होता आणि एकटाच होता. ऋषभ पंतने सांगितले की त्याला झोप लागली होती. त्यामुळेच ही दुर्घटना घडली आहे. दुखापतीमुळे ऋषभ पंतला आगामी श्रीलंका मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋषभ पंत दिल्लीहून घरी परतत होता. ते रुरकीच्या हम्मादपूर झाल येथे पोहोचले होते आणि तिथे कारचा भीषण अपघात झाला. यानंतर ऋषभ पंतला गंभीर स्थितीत दिल्लीला रेफर करण्यात आले आहे. ऋषभ पंतच्या कपाळावर, पाठीवर आणि पायाला अधिक जखमा आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. ऋषभची प्लास्टिक सर्जरी होऊ शकते. (हे देखील वाचा: Rishabh Pant Car Accident Spot Video: ऋषभ पंतच्या कारचा जिथे अपघात झाला त्या ठिकाणचा व्हिडीओ आला समोर (Watch Video)
टीम इंडियाचा युवा फलंदाज ऋषभ पंतच्या अपघाताची बातमी कळताच क्रिकेट जगतात आणि चाहत्यांमध्ये निराशा पसरली होती. ऋषभ पंतला लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. टीम इंडियाचा माजी सलामीवीर सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण, मुनाफ पटेल यासारख्या अनेक दिग्गज खेळाडूंनी ऋषभ पंतच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली आहे.
Wishing dear @RishabhPant17 a super speedy recovery. Bahut hi Jald swasth ho jaao.
— Virender Sehwag (@virendersehwag) December 30, 2022
Praying for Rishabh Pant. Thankfully he is out of danger. Wishing @RishabhPant17 a very speedy recovery. Get well soon Champ.
— VVS Laxman (@VVSLaxman281) December 30, 2022
Did I am hearing correct news of @RishabhPant17
Praying for sppedy recovery to #RishabhPant#DriveSafe pic.twitter.com/X6MJLfANMj
— Munaf Patel (@munafpa99881129) December 30, 2022
Gell Well Soon @RishabhPant17
God heal you soon ??
Please God #RishabhPant pic.twitter.com/JdxxWoYgIK
— Roger Binny ?? (@iRogerBinny) December 30, 2022
Really hope Rishabh Pant is ok. The car looks absolutely quashed. Horrific to see even.
— Abhinav Mukund (@mukundabhinav) December 30, 2022
Rishabh Pant met with an accident between Manglaur and Narsan in Haridwar district. He has now been shifted to a hospital in Dehradun after receiving primary treatment in a hospital in Roorkee.
— Delhi Capitals (@DelhiCapitals) December 30, 2022
Wishing a very speedy & full recovery to Rishabh! Take care @RishabhPant17
— Gautam Gambhir (@GautamGambhir) December 30, 2022
Wishing you a speedy recovery @RishabhPant17 Get well soon.
— Anil Kumble (@anilkumble1074) December 30, 2022
उपचाराचा संपूर्ण खर्च उत्तराखंड सरकार करणार
ऋषभ पंतच्या रस्ता अपघातानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचे वक्तव्य समोर आले आहे. पुष्कर सिंह धामी म्हणाले की, गरज पडल्यास ऋषभ पंतला एअरलिफ्ट केले जाईल. ऋषभ पंतला सर्व वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातील. त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार आहे. त्यांना सर्व सुविधा दिल्या जातील. विशेष म्हणजे ऋषभ पंत बांगलादेश दौऱ्यावर गेला होता. पण दुखापतीमुळे ऋषभ पंतला श्रीलंकेविरुद्ध विश्रांती देण्यात आली होती.