Team India (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना उद्या म्हणजेच 27 जानेवारीला होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आता हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडिया टी-20 मध्ये न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. मालिका सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Rututraj Gaikwad)  दुखापती मुळे बाहेर पडला आहे. वनडेत पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंड संघाचे लक्ष्य टी-20 मालिकेत पलटवार करण्याचे असेल. त्याचबरोबर टी-20 मध्ये आपला दबदबा कायम ठेवण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाने गेल्या वर्षभरात एकही द्विपक्षीय टी-20 मालिका गमावलेली नाही. यंदाही टीम इंडियाने विजयाने सुरुवात केली आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे, त्यामुळे हार्दिक पांड्या पुन्हा एकदा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. पहिल्या टी-20 सामन्यात हार्दिक पांड्यासाठी योग्य प्लेइंग इलेव्हन निवडणे थोडे कठीण होऊ शकते. पहिल्या सामन्यात ईशान किशन सलामीवीर शुभमन गिलसोबत डावाची सुरुवात करू शकतो. त्याचबरोबर यष्टीरक्षक फलंदाज राहुल त्रिपाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाच्या मधल्या फळीबद्दल सांगायचे तर, त्यात सूर्यकुमार यादव, कर्णधार हार्दिक पंड्या आणि अष्टपैलू दीपक हुडा दिसतील. हे तिन्ही खेळाडू त्यांच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जातात. यासोबतच ते कोणत्याही गोलंदाजाविरुद्ध मोठे फटके खेळण्यात माहिर आहे. (हे देखील वाचा: IND vs NZ 1st T20: न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यापूर्वी एमएस धोनीने भारतीय संघाची घेतली अचानक भेट, सगळे खेळाडू झाले अवाक (Watch Video)

दुसरीकडे, गोलंदाजी विभागाबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडिया तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकते. वेगवान गोलंदाजीत उमरान मलिक, अर्शदीप सिंह आणि शिवम मावी यांना संधी मिळू शकते. त्याच वेळी, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आणि वरिष्ठ लेग-स्पिनर युजवेंद्र चहल हे फिरकीपटूंमध्ये खेळताना दिसू शकतात.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:- शुभमन गिल, इशान किशन, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, शिवम मावी आणि उमरान मलिक.