Photo Credit-X

India Women's U19 National Cricket Team vs South Africa Women's U19 National Cricket Team Match Scorecard:  भारताच्या 19 वर्षांखालील महिला संघाने इतिहास रचला आहे. टीम इंडियाने 2025 च्या 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद जिंकले आहे. अंतिम सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव केला. विशेष म्हणजे या स्पर्धेत खेळलेले सर्व सामने भारताने जिंकले. त्याला एकाही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला नाही. टीम इंडियासाठी गी त्रिशाने स्पर्धेत शानदार कामगिरी केली. सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत ती अव्वल स्थानावर राहिली. शेवटच्या सामन्यात देखील तीन 44 धावांची महत्तवपुर्ण खेळी करत सामनाविराचा पुरस्कार मिळवला. यासोबतच तीने मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील मिळवला.  (हेही वाचा  -  India Wins ICC Women's U19 T20 World Cup 2025 Trophy: भारतीय महिला अंडर 19 संघाने सलग दुसऱ्यांदा विश्वविजेत्या ट्रॉफीवर नाव कोरले; दक्षिण आफ्रिकेला 9 विकेट्सने केले पराभूत)

अंतिम सामन्यात भारताविरुद्ध ऑलआउट होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने 82 धावा केल्या. या काळात, वुर्स्टने संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याने 18 चेंडूंचा सामना करत २३ धावा जोडल्या. यादरम्यान त्याने 3 चौकार मारले. सलामीवीर जेम्मा बोथा 16 धावा करून बाद झाली. यादरम्यान, त्रिशाने भारताकडून 3 विकेट्स घेतल्या. पारुनिका आणि आयुषी शुक्ला यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. वैष्णवीनेही 2 विकेट्स घेतल्या.

पाहा पोस्ट -

रविवारी येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला नऊ विकेट्सने हरवून सलग दुसऱ्यांदा आयसीसी महिला 19 वर्षांखालील टी20 विश्वचषक जिंकला. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 83 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, भारताने 11.2 षटकांत 52 चेंडू शिल्लक असताना एका गडी गमावून 84 धावा करून सहज विजय मिळवला. भारताकडून गोंगाडी त्रिशा सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आणि तिने 33 चेंडूत नाबाद 44 धावा केल्या. सानिका चालकेनेही 22 चेंडूत 26 धावांची नाबाद खेळी केली. त्याआधी, त्रिशा (15 धावांत तीन बळी) यांच्या नेतृत्वाखालील भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 20 षटकांत 82 धावांत गुंडाळले.