Photo Credit- X

India Women's U19 National Cricket Team vs South Africa Women's U19 National Cricket Team Match Scorecard: भारतीय अंडर-19 महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंडर-19 महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातआयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक 2025 अंतिम सामना 02 फेब्रुवारी (शनिवार) हा सामना क्वालालंपूर येथील बायुमास ओव्हल येथे खेळवण्यात आला. भारतीय अंडर-19 महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेट्सनी पराभव करून सलग दुसऱ्यांदा आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक जिंकला. भारतीय संघाने अंतिम सामन्यात शानदार कामगिरी केली आणि संपूर्ण सामन्यात दक्षिण आफ्रिकेला वर्चस्व गाजवण्याची एकही संधी दिली नाही.(IND vs SA, Women's U19 T20 World Cup 2025 Final Scorecard Update: दक्षिण आफ्रिका संघाला तिसरा धक्का, आयुषी शुक्लाने दियारा रामलखनला बाद करून पाठवले पॅव्हेलियनमध्ये; सामन्याचे स्कोअरकार्ड पहा)

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. गोंगाडी त्रिशाने 33 चेंडूत 44 धावांची नाबाद खेळी केली, तर सानिका चालकेने 22 चेंडूत 26 धावा करत संघाला विजयाच्या जवळ नेले. यष्टीरक्षक-फलंदाज जी. कमलिनी आठ धावा करून बाद झाली. पण तोपर्यंत भारत विजयाच्या अगदी जवळ होता. भारताने फक्त 11.2 षटकांत 84 धावा करत सामना सहज जिंकला आणि जेतेपदावर कब्जा केला.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच षटकांपासून दबाव निर्माण केला. दक्षिण आफ्रिकेचा डाव 20 षटकांत 82 धावांत गुंडाळला गेला. जेम्मा बोथा (16), मिके व्हॅन फॉरेस्ट (23) आणि फेय काउलिंग (15) यांनी प्रतिकार दाखवला पण इतर फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत. भारतीय गोलंदाजीत, गोंगाडी त्रिशा सर्वात प्रभावी ठरली. तिने चार षटकांत 15 धावा देत तीन बळी घेतले. पारुनिका सिसोदिया आणि आयुषी शुक्ला यांनीही प्रत्येकी दोन विकेट घेत प्रतिस्पर्ध्याला मोठी धावसंख्या गाठण्यापासून रोखले.